संचालकावर उषोषणाची वेळ
By Admin | Updated: April 2, 2017 00:08 IST2017-04-02T00:06:04+5:302017-04-02T00:08:57+5:30
माजलगाव : बारदाण्याच्या मागणीसाठी येथील बाजार समितीचे सभापती अशोक डक, उपसभापती नीळकंठ भोसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व संचालक मंडळ शुक्रवारी उपोषण करणार आहे

संचालकावर उषोषणाची वेळ
माजलगाव : येथील बाजार समिती अंतर्गत नाफेडमार्फत तूर खरेदी केंद्रात शेतकऱ्यांची तूर खरेदी चालू असताना केवळ बारदाण्याअभावी खरेदी केंद्र अनेक वेळा बंद पडल्यामुळे अडचणी येत असून, शासन बारदाणा पुरविण्यात अपयशी येत आसल्याने बारदाण्याच्या मागणीसाठी येथील बाजार समितीचे सभापती अशोक डक, उपसभापती नीळकंठ भोसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व संचालक मंडळ शुक्रवारी उपोषण करणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे
बीड जिल्ह्यात सर्वांत जास्त आवक माजलगावला असूनही सर्व सोयींनीयुक्त येथील बाजार समितीच्या टी.एम.सी.च्या आवारात गेल्या तीन महिन्यापासून तूर खरेदी असून, या ठिकाणी बीड जिल्ह्यासह परभणी व जालना जिल्ह्यांतून तूर येत आहे. आजपर्यंत या खरेदी केन्द्रावर ४३ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. बारदाण्या अभावी ३५ हजार क्विंटल तूर खरेदी करणे बाकी आहे. सध्या या तूर खरेदी केंद्रावर १५ फेब्रुवारीपासुनच्या तुरीचे माप होणे बाकी आहेत. सदरील तूर दि विदर्भ मार्केटिंग फेडरेशन लि., नागपूर शाखा बीडमार्फत दि. १२ जानेवारीपासून तूर खरेदी येथील बाजार समितीच्या टी.एम. सी.च्या आवारात सचिव डी.बी. फुके यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे.