शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

५५ लाख लिटर पाणी उचलूनही तहान भागेना

By admin | Updated: April 18, 2016 00:55 IST

राजकुमार जोंधळे , लातूर शहराला मिरजहून रेल्वेने दररोज ५ लाख लिटर, माळकोंडजी १ लाख २५, डोंगरगाव २८ लाख ७, भंडारवाडी १५ लाख आणि साई प्रकल्पावरुन

राजकुमार जोंधळे , लातूरशहराला मिरजहून रेल्वेने दररोज ५ लाख लिटर, माळकोंडजी १ लाख २५, डोंगरगाव २८ लाख ७, भंडारवाडी १५ लाख आणि साई प्रकल्पावरुन २ लाख ५० हजार असे दररोज पाणी उचलले जात आहे़ दिवसाला जवळपास ५५ लाख लिटरपेक्षा अधिक पाणी संकलित करुन मनपाच्या १४० टॅँकरव्दारे शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र पाण्याची ओरड लातूरकरांची कायम आहे़ पुरेसे पाणी पोहचत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे़एका कुटूंबाला ८ दिवसाला २०० लिटर पाणी दिल्याचा दावा मनपाकडून केला जात असला तरी नागरिक मात्र यावर समाधानी नाहीत़ नियोजनाच्या अभावामुळे पाणी वितरण व्यवस्थित होत नसल्याचे नागरिक म्हणत आहेत़शहरातील एकूण ३५ प्रभागात प्रत्येकी दोन टॅँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात असल्याचा दावा मनपा प्रशासनाकडून केला जात आहे. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये तीव्र पाणीटंचाई होती. सार्वजनिक पाण्याचे स्त्रोत पूर्णत: आटल्याने, पाणी आणायचे कोठून? हा प्रश्न प्रशासनासमोर होता. आज पाणी संकलित करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. मात्र संकलित पाण्याची वितरण व्यवस्था ‘ढिसाळ’ असल्याने पाण्याला पाय फुटू लागले आहेत. काही नगरसेवकांची दांडगाई आणि ज्यांच्या मनगटात पाणी आहे, अशा नगरसेवकांकडून प्रशासनाच्या छाताडावर बसून हे टॅँकर पळविले जात आहेत. पाणी वाटपात होणारा दुजाभाव सर्वसामान्यांच्या मुळावर उठला आहे. ज्यांची विकतच्या पाण्यावर आपली तहान भागविण्याची कुवत आहे, अशांना पाणीटंचाईच्या झळांची ‘झळ’ लागत नाही. मात्र ज्यांना घोटभर पाण्यासाठी शहरातील सार्वजनिक विंधन विहरीवर थांबावे लागते, अशांचे बेहाल आहेत. ४४ अंश उन्हाच्या चटक्यासोबत आता पाणीटंचाईचा चटकाही सहन करण्याची वेळ लातुरातील सर्वसामान्य नागरिकांवर आली आहे. इथल्या सर्वसामान्यांना दुष्काळ भयान वाटत असला तरी, प्रशासनाला मात्र तो ‘सुकाळ’च वाटतो आहे.शहरात संकलित करण्यात आलेल्या पाण्याचे टॅँकरच प्रशासनाच्या मदतीने काही नगरसेवकांनी पळविल्याची माहिती आता पुढे आली आहे. एकाच प्रभागात सातत्याने पाणीपुरवठा केला जात असल्याचा प्रकारही पुढे आला आहे. ज्या प्रभागात गेल्या तीन आठवड्यांपासून टॅँकरच फिरकले नाही, अशा नागरिकांनी पाण्यासाठी रात्रीचा दिवस अन दिवसाची रात्री केली आहे. भीषण पाणीटंचाई असताना प्रशासनाकडून मात्र पाणीवाटपात दुजाभाव केला जात असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. भंडारवाडी, निम्न तेरणा, डोंगरगाव आणि साई बॅरेजेसमधून एवढे पाणी उचलूनही शहरातील पाणीटंचाईची तीव्रता कमी नसल्याचे नागरिकांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले़