शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

अधिग्रहणांची अडीच कोटींची देयके थकली

By admin | Updated: April 8, 2016 00:27 IST

लातूर : लातूर जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. जिल्हा प्रशासनाकडून पर्यायी उपाययोजना करण्याचे काम सुरू असले,

लातूर : लातूर जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. जिल्हा प्रशासनाकडून पर्यायी उपाययोजना करण्याचे काम सुरू असले, तरी दिवसेंदिवस टँकर व अधिग्रहणांची संख्या वाढत आहे. लातूर जिल्ह्यातील १० तालुक्याला ११४१ अधिग्रहणे व २४० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यासाठी शासनाकडून आलेला निधी अपुरा पडत असल्याने आणखी २ कोटी ६९ लाख ९७ हजार रुपयांच्या निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.लातूर जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे काही गावांतील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. या वाढत्या टंचाईपासून नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी ७३१ गावांत ११४१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तर १८१ गावे आणि ४१ वाड्या अशा एकूण २२२ ठिकाणी २४० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. लातूर तालुक्यातील २९ गावे व एका वाडीवर ४० टँकरद्वारे १०९ गावांमध्ये १८२ विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. औसा तालुक्यातील २० गावे आणि दोन वाड्यांवर २३ टँकरद्वारे आणि ११५ गावांमध्ये १६५ विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा सुरू केला आहे. रेणापूर तालुक्यातील १५ गावे आणि ४ वाड्यांवर २० टँकरद्वारे आणि ६७ गावांमध्ये ९६ विहिरींचे अधिग्रहण करून पाणी दिले जात आहे. उदगीरमधील २६ गावे आणि १४ वाड्यांवर ३८ टँकर आणि ७४ गावांकरिता १११ विहिरी, अहमदपूर तालुक्यातील २९ गावे व ८ वाड्यांवर ४२ टँकर तर १०२ गावांकरिता १३७ विहिरी, चाकूर तालुक्यातील १९ गावांत २३ टँकर आणि ७० गावांकरिता ९५ विहिरी, देवणी तालुक्यातील १२ गावे आणि तीन वाड्यांवर १२ टँकरद्वारे आणि ३६ गावांमध्ये ५७ विहिरी, जळकोटमधील १४ गावे व ७ वाड्यांवर २० टँकर तर ३७ गावांत ५१ विहिरी, निलंग्यातील १२ गावे आणि दोन वाड्यांमध्ये १७ टँकर आणि ९७ गावांकरिता २११ विहिरी, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ५ गावांमध्ये ५ टँकर आणि २४ गावांमध्ये ३७ विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दिवसेंदिवस पाण्याची टंचाई वाढत असल्यामुळे या वाढत्या टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी टँकर व अधिग्रहणाची संख्या वाढवावी लागत आहे. यासाठी पुरेसा निधी उपलब्ध व्हावा, यासाठी प्रलंबित २ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाची धावपळ सुरू आहे. (प्रतिनिधी)