गेवराईत घड्याळाची टिकटिक..!
By Admin | Updated: April 24, 2015 00:39 IST2015-04-24T00:17:54+5:302015-04-24T00:39:34+5:30
गेवराई : सहा महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीत दोन पंडित एकत्र येऊनही भूईसपाट झालेल्या राष्ट्रवादीच्या घड्याळाने गुरुवारी १२ पैकी ९ जागांवर झेंडा फडकावत ‘टिकटिक’ केली.

गेवराईत घड्याळाची टिकटिक..!
गेवराई : सहा महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीत दोन पंडित एकत्र येऊनही भूईसपाट झालेल्या राष्ट्रवादीच्या घड्याळाने गुरुवारी १२ पैकी ९ जागांवर झेंडा फडकावत ‘टिकटिक’ केली. तलवाडा या सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसच्या अॅड. सुरेश हात्तेंनी वरचष्मा कायम राखला. गढीमध्ये आ. अमरसिंह गटाने सत्ता मिळवत विजयाची गुढी उभारली असून गढी पंडितांचीच असल्याचे सिद्ध केले आहे.
१२ ग्रा.पं.साठी बुधवारी मतदान झाले होते गुरूवारी तहसील कार्यालयात मतमोजणी झाली. विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करीत, फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. एकूण १४ ग्रा. पं. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. पैकी सुर्डी व टाकळगव्हाण बिनविरोध निघाल्या. सुर्डीवर आ. लक्ष्मण पवार तर टाकळगव्हाणवर आ. अमरसिंह पंडित गटाने वर्चस्व मिळवले.
नवे कारभारी
१२ ग्रामपंचायतींमधील ९७ जागांसाठी २३५ उमेदवार आमनेसामने होते. ग्रा.पं.निहाय विजयश्री खेचून आणणारे नवे कारभारी असे...
चोपड्याची वाडी : कुशीवर्ता चिलगर, राधा चिलगर, रमेश कोळेकर, अर्चना तुरे, भगवान तुरे, माऊली चोपडे, दैवशाला बाबरे
डोईफोडवाडी : पांडूरंग शेवाडे, मंगल गर्जे, भरत तवरे, मुक्त वाघमोडे, अशोक भारती, निलावती रोकडे, सीता वाघमोडे
तळेवाडी : राणोजी डोंगरे, कस्तुराबाई जाधव, लक्ष्मण थोटे, निर्मल चौधरी, हनुमान गोंजारे, सुमन थोटे, सुनीता चौधरी
कुंभारवाडी : दिगांबर जाधव, भगवान जाधव, शैला जाधव, राधा गायकवाड, अर्जून धनवडे, जयसिंह जाधव, मंगल जाधव, छाया शिंदे, राजामती कोकरे
जवाहरवाडी : सत्यभामा पैठणे, विकास जवरे, पद्मा जवरे, सुखदेव चौधर, शोभा जवरे, छगाबाई जवरे, अशोक दरेकर
पांढरवाडी : महमद रौफ, पूजा खिसाडे, महम्मद अखिल, अर्चना जाधव, दादासाहेब जाधव, वैजीनाथ जाधव, रोशनबी शेख
तलवाडा : संजीवनी हात्ते, सुंदर कुंड, कचरू मरकड, अरूणा नाटकर, संतोष हातागळे, राधाकिसन शिंगणे, सुरेखा गांधले, मोमीन खतीब, अहमदबी पठाण, शांता पवार, दीपाली आठवले, सोनू शिंदे, किशोर हात्ते, पारूबाई गर्जे, भाऊ गायकवाड, चांगुणा गर्जे, सुमन चव्हाण.
गढी : विष्णू घोंगडे, रुक्मिणी मुंडे, शेख आशाबी, दिलीप नाकाडे, अंकुश गायकवाड, चंद्रकला खाडे, बेबी पठाण, आशा कांबळे, बेबी पठाण, अमोल ससाणे, पार्वती नाकाडे, मनीषा मुळीक
गोविंदवाडी : विजया बिचकुले, जिजाबाई कदम, विकास शेंडगे, कौशल्या मोहिते, अमृता हातागळे, छगन चव्हाण, संध्या मराठे
वंजारवाडी : विमल तारगे, केशरबाई चोरमले, हरिभाऊ तारगे, आसाराबाई पवार, बाबू पवार, सुरेश दाभाडे, त्रिशला दाभाडे
मुळूकवाडी : मथुरा गिरी, कौशल्या जाधव, लक्ष्मी साबळे, महादेव पवार, साळुजी मोरे, सगुणा वाघ
चव्हाणवाडी : अजिनाथ गर्जे, अंबादास भुजंगे, लक्ष्मी चव्हाण, दत्तात्रय समगे, सविता हातागळे, मनीषा चौधरी, श्रीमंत यादव, आशा गर्जे, आशा चिकणे (वार्ताहर)