शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

स्पंदननगरात चोरांचा धुमाकूळ; भरदिवसा पाच फ्लॅट फोडले

By admin | Updated: November 17, 2015 00:32 IST

औरंगाबाद : सिडको एन-४ परिसरातील स्पंदननगर येथील दोन वेगवेगळ्या अपार्टमेंटमधील पाच फ्लॅट फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला.

औरंगाबाद : सिडको एन-४ परिसरातील स्पंदननगर येथील दोन वेगवेगळ्या अपार्टमेंटमधील पाच फ्लॅट फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी दुपारी ३ ते ५ वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.मुकुुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्या, घरफोड्यांचे सत्र दिवाळीतही सुरूच आहे. सिडको एन-४ मधील स्पंदननगर येथील आसावरी अपार्टमेंटमधील एल-९ फ्लॅटमध्ये राहणारे प्रशांत पाडुंरग पिसे हे एका खाजगी कंपनीत नोकरी करतात. तर त्यांची पत्नी एका अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापिका आहे. दोघेही पती-पत्नी नोकरीनिमित्त घराबाहेर असल्याने त्यांच्या घराला कुलूप होते.चोरट्यांनी दाराचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट तोडून चोरट्यांनी साडेतीन तोळ्याचे मंगळसूत्र, तीन तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, कानातील कर्णफुले अंदाजे १२ ग्रॅम, तीन ग्रॅमची ठुसी, ४ ग्रॅमची सोन्याची अंगठी आणि रोख सहा हजार रुपये चोरून नेले. त्यांच्याच अपार्टमेंटमधील रहिवासी विपुल तनसुखलाल वडेरा यांचा फ्लॅट क्र मांक एल-५ ला चोरट्यांनी लक्ष्य केले. त्यांच्या दाराचा कोंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. या घटनेत चोरट्यांना मात्र वडेरा यांच्या घरातील बेडरूमचा दरवाजा उघडता आला नाही. त्यामुळे चोरट्यांच्या हाती फारसे काहीच लागले नाही. याच अपार्टमेंटमध्ये चार महिन्यांपूर्वी भाड्याने राहण्यास आलेल्या एका दाम्पत्याचे बंद घर चोरट्यांनी फोडले. या घटनेत त्यांच्या घरातून रोख अडीच हजार रुपये आणि इतर किमती वस्तू चोरट्यांनी पळविल्या.तर वसंत अपार्टमेंटमधील रहिवासी प्राध्यापक अनिल सोनवणे यांचे कुटुंब दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी बीड जिल्ह्यातील फु लसावंगी येथे गेले होते. त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी लक्ष्मीपूजनासाठी वापरलेल्या कोऱ्या नोटांचे दोन हजार रुपये आणि ऐवज लांबविला.माधुरी रुस्तुम महाले ही गृहिणी आपल्या परिवारासह तापडिया फेममध्ये प्रेम रतन धन पायो हा सिनेमा पाहण्यासाठी दुपारी ३ वाजता गेल्या. त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप होते. त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दीड तोळ्याचा नेकलेस, दोन तोळ्याचे कानातील जोड, पाच ग्रॅमची अंगठी आणि १३ हजार रुपये रोख, असा ऐवज चोरून नेला. दोन वेगवेगळ्या अपार्टमेंटमधील बंद असलेली पाच वेगवेगळी घरे फोडल्याने रहिवासी घाबरले आहेत. चोरट्यांनी स्पंदननगरात भरदिवसा पाच घरे फोडल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, पोलीस निरीक्षक नाथा जाधव, फौजदार नईम पठाण आणि अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. उपायुक्त श्रीरामे यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.