चोरट्यांचा धुमाकूळ

By Admin | Updated: March 18, 2017 23:48 IST2017-03-18T23:45:47+5:302017-03-18T23:48:36+5:30

वडीगोद्री : परिसरात चोराट्यांचा धुमाकूळ सुरू आहे.

Thunderbolt | चोरट्यांचा धुमाकूळ

चोरट्यांचा धुमाकूळ

वडीगोद्री : परिसरात चोराट्यांचा धुमाकूळ सुरू असून, एकाच रात्री दारुचे दुकान, मेडीकल फोडण्यासह दुचाकी वाहन लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असून, नागरिकात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
अंंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील देशी दारु चे शटर फोडून चोरट्यांनी रोकड न मिळाल्याने देशी दारुवरच ताव मारत सोळा हजाराचे सहा बाँक्स लंपास केले. श्रीराम तारख यांची दुचाकी लंपास केली. वडीगोद्री येथील दत्तात्रय खैरे यांची दुचाकी चोरु न अंतरवाली सराटी रोडवर एका शेतात फेकून दिली. पेट्रोल संपल्यामुळे बंद पडल्याने फेकून दिली. पण वाहनाचे टाकी फोडून नुकसान केले. त्यानंतर शहागड येथे डॉ. डाके यांचे ओम साई मेडीकलचे शटर तोडून साडेतीन हजार रुपयांसह घड्याळ लंपास केले
आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांत भितीचे निर्माण झाले आहे. (वार्ताहर)

Web Title: Thunderbolt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.