शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
4
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
5
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
6
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
7
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
8
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
9
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
10
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
11
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
12
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
13
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
14
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
15
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
16
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
17
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
18
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
19
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
20
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांचा धुमाकूळ

By admin | Updated: December 22, 2014 01:21 IST

औरंगाबाद : शहरात चोरट्यांचा धुमाकूळ दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी जुन्या मोंढ्यात एकापाठोपाठ चार दुकाने व एक घर फोडले.

औरंगाबाद : शहरात चोरट्यांचा धुमाकूळ दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी जुन्या मोंढ्यात एकापाठोपाठ चार दुकाने व एक घर फोडले. या दुकानांमधून रोख रक्कम, केशर, काजू, बदाम व किराणा माल, असा लाखो रुपयांचा माल चोरट्यांनी पळविला. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.जुन्या मोंढ्यात सुनील कांकरिया यांचे संजयकुमार अँड सन्स नावाचे किराणा मालाचे होलसेलचे दुकान आहे. दुकानाला लागूनच रिटेल मालाचेही गोदाम आहे. रात्री ठीक साडेबारा वाजेच्या सुमारास दोन चोरट्यांनी मागे असलेल्या गोदामाचा पत्रा उचकटून दुकानात प्रवेश केला. गोदामातील काही माल चोरल्यानंतर चोरटे पुढच्या होलसेलच्या दुकानात घुसले. येथून गल्ल्यातील रोख रक्कम, तसेच काजू, बदाम व केशरची पाकिटे, असा सुमारे दोन लाखांचा माल चोरी करून चोरटे बाहेर पडले. मग चोरट्यांनी तेथून आपला मोर्चा बाजूलाच असलेल्या भगवानदास फुलवाणी यांच्या लक्ष्मी ट्रेडिंग कंपनीकडे वळविला. या दुकानाच्याही छताचा चोरट्यांनी पत्रा उचकटून आत प्रवेश केला. या दुकानातून नेमका किती माल चोरी गेला हे कळू शकले नाही.