तुळजापुरात चोरट्यांचा धुमाकूळ
By Admin | Updated: May 20, 2015 00:18 IST2015-05-20T00:14:21+5:302015-05-20T00:18:27+5:30
तुळजापूर : येथील देवी मंदीर परिसर, बसस्थानक परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, मंदीर परिसरातून एका महिला भाविकाच्या पर्समधील सोन्याचे पॅन्डल

तुळजापुरात चोरट्यांचा धुमाकूळ
तुळजापूर : येथील देवी मंदीर परिसर, बसस्थानक परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, मंदीर परिसरातून एका महिला भाविकाच्या पर्समधील सोन्याचे पॅन्डल, अंगठी असा १६ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला़ ही घटना मंगळवारी सकाळी घडली असून, तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे देवीर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे़ मात्र, मागील काही दिवसांपासून बसस्थानकासह देवी मंदीर परिसरात भाविकांना लूटणारी टोळी सक्रिय झाली आहे़ भाविकांचा लाखो रूपयांचा ऐवज चोरीस जात असताना तुळजापूर पोलिसांना चोरट्यांच्या मुसक्या अवळण्यात अपयश आले आहे़ मंळवारी देवी दर्शनासाठी केंद्र, राज्यातील मंत्री येणार असल्याने मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता़ मात्र, तरीही चोरट्यांनी सकाळच्या सुमारास अकोला येथून आलेल्या महिला भाविकाच्या पर्समधील डबीत ठेवलेले १५ ग्रॅम सोन्याचे पॅन्डल, ५ ग्रॅम सोन्याची अंगठी असा १६ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ (वार्ताहर)