शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

सत्संग कार्यक्रमात चोरट्यांचा धुमाकूळ

By admin | Updated: January 5, 2015 00:36 IST

उस्मानाबाद : शहरातील श्री तुळजाभवानी दूध संघासमोरील लॉन्समध्ये आयोजित सत्संग सोहळ्यात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला़

उस्मानाबाद : शहरातील श्री तुळजाभवानी दूध संघासमोरील लॉन्समध्ये आयोजित सत्संग सोहळ्यात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला़ अनेक महिलांचे लाखो रुपयांच्या दागिन्यांसह भाविकांचे पॉकेट हातोहात लंपास करण्यात आले़ ही घटना रविवारी दुपारी घडली असून, या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे़याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरातील तांबरी विभाग येथील सीमा सुरेश तायडे या रविवारी दुपारी जिल्हा दूध संघासमोर आलेल्या एका लॉन्सवर आयोजित सत्संग कार्यक्रमासाठी गेल्या होत्या़ दुपारी महाप्रसाद देण्यात येत असताना मोठी गर्दी झाली होती़ या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी सीमा तायडे यांच्या गळ्यातील ५० हजाराचे दोन तोळ्याचे गंठण, शारदा थोरात (राक़ौडगाव) यांच्या गळ्यातील ५० हजाराचे दोन तोळ्याचे गंठण, रतनबाई कोळगे (रा़शाहूनगर) यांंच्या गळ्यातील ४७ हजार रुपयांचे दीड तोळ्याचे गंठण असा एकूण १ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याच्या तक्रारी शहर ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत़ तर त्यानंतर उंबरे कोठा भागात राहणाऱ्या सीमा उंबरे यांनीही दीड तोळ्याचे गंठण लंपास झाल्याची तक्रार दिली आहे़ याच कार्यक्रमात महिलांच्या दागिन्यांसह अनेकांच्या खिशातील पॉकेटही चोरट्यांनी लंपास केले़ या चोरीच्या प्रकरणात महिलांच्या गर्दीत महिला चोर तर पुरूषांच्या गर्दीत पुरूष चोरटे घुसल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे़ ठाण्यात अनेकांनी तक्रारीही दिलेल्या नाहीत़ सदरील प्रकरणाचा तपास पोना राठोड हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)सत्संग कार्यक्रमाला गेल्यानंतर अनेक महिलांनी स्वत:च्या गळ्यातील दागदागिन्यांची तर पुरूषांनी खिशातील पॉकेट व इतर वस्तूंची यथायोग्य काळजी घेतली नाही़ गर्दीच्या ठिकाणी चोरीच्या घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत़ गर्दीत लाखमोलाचे दागिने संभाळण्यात निष्काळजीपणा झाल्याने चोरट्यांनी हात साफ केल्याची चर्चाही परिसरात सुरू होती़तुळजापूर येथील जुन्या बसस्थानकात समीर अहमद मुजावर (वय-३२ रा़सोलापूर) हे शनिवारी दुपारी थांबले होते़ उस्मानाबादकडे येणाऱ्या बसमध्ये ते चढत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पँन्टीचा खिसा कापून रोख साडेतीन हजार रूपये लंपास केले़ या प्रकरणी मुजावर यांच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास फौजदार पठाण हे करीत आहेत़