धिंगाणा घालणारे १० ताब्यात

By Admin | Updated: April 8, 2017 21:36 IST2017-04-08T21:33:13+5:302017-04-08T21:36:55+5:30

अंबाजोगाई : शहरातील वर्दळीच्या ठिकाणी धिंगाणा घालून शांतताभंग करणाऱ्या दहा जणांना शुक्रवारी महिला गस्ती पथकाने पकडले.

Thrust 10 possession | धिंगाणा घालणारे १० ताब्यात

धिंगाणा घालणारे १० ताब्यात

अंबाजोगाई : शहरातील वर्दळीच्या ठिकाणी धिंगाणा घालून शांतताभंग करणाऱ्या दहा जणांना शुक्रवारी महिला गस्ती पथकाने पकडले.
संकेत गोरे, राहुल कांबळे, किरण लाड, ज्ञानेश्वर शिंदे, आकाश दरेकर, अक्षय कांबळे, राम काळम, अभिमन्यू गिरी यांचा त्यात समावेश आहे. हे सर्व जण हत्तीखाना व योगेश्वरी मंदिर परिसरात दंगामस्ती करीत होते. या सर्वांना पकडून अंबाजोगाई येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांच्यावर खटला दाखल केला. गस्ती पथकाच्या प्रमुख सहायक निरीक्षक विशाखा धुळे, पो.कॉ. रंजना सानप, कुसुम घुले, रामहरी मस्के, गोरख राठोड यांनी ही कारवाई केली. छेडछाड करणाऱ्यांची नावे कळविण्याचे आवाहन आहे. (वार्ताहर)

Web Title: Thrust 10 possession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.