अल्पवयीन मुलीची छेड काढून मारहाण
By Admin | Updated: October 12, 2016 01:16 IST2016-10-12T00:48:02+5:302016-10-12T01:16:05+5:30
वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथे एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढून तिच्या आई व बहिणीस मारहाण करणाऱ्या तरुणाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अल्पवयीन मुलीची छेड काढून मारहाण
वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथे एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढून तिच्या आई व बहिणीस मारहाण करणाऱ्या तरुणाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
रांजणगाव शेणपुंजी येथील एक अल्पवयीन मुलगी आई व लहान बहिणीसोबत किरायाच्या घरात वास्तव्यास आहे. त्या मुलीची आई वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला जाऊन मुलांचे शिक्षण व कुटुंबाचे पालन-पोषण करते.
या महिलेची १६ वर्षीय मुलगी रांजणगावातील एका महाविद्यालयात ११ वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून ही अल्पवयीन मुलगी महाविद्यालयात शिक्षणासाठी ये-जा करीत असताना आरोपी कल्लू म्हस्के (रा.कृष्णानगर, रांजणगाव) हा सतत पाठलाग करून तिला रस्त्यात अडवून तिची छेड काढीत होता. पंधरा दिवसांपासून हा छेडछाडीचा प्रकार सुरू असल्यामुळे त्या तरुणीने या प्रकाराची माहिती घरी आल्यानंतर आईला दिली होती. त्यामुळे त्या मुलीच्या आईने आरोपी कल्लू म्हस्के यांच्या घरी जाऊन त्यास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता कल्लू याने त्या मुलीच्या आईस शिवीगाळ करून मारहाण केली. त्यामुळे सदर महिलेने ९ आॅक्टोबरला एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात रोडरोमिओ कल्लू म्हस्के यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती.
या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपी कल्लू म्हस्के याच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक नाथा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार ताहेर पटेल करीत आहेत.