शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

थरार ‘लोकमत महामॅरेथॉन’चा; धावण्याचा विक्रम नोंदविण्यासाठी छत्रपती संभाजीनगरकर सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 13:45 IST

धावण्यासाठी हजारो धावपटू झाले आतुर, नोंदणी आली अंतिम टप्प्यात

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरकरांसाठी आरोग्य आणि अभिमानाचा केंद्रबिंदू ठरलेली ‘लोकमत महामॅरेथॉन’ १४ डिसेंबर रोजी विभागीय क्रीडा संकुल येथे रंगणार आहे. डॉ. भाले लाइफलाइन मेडिकल डिव्हायसेस प्रस्तुत व पॉवर्ड बाय मिसेस फूड राइट व अदानी समूह लोकमत महामॅरेथॉनचे यंदा नववे पर्व असून, प्रत्येक पर्वागणिक धावपटूंचा सहभागी होण्याचा आलेख उंचावतच आहे. त्यामुळे यंदाही हा आलेख नक्कीच उंचावणार असून, लोकमत महामॅरेथॉनमध्ये छत्रपती संभाजीनगरकर धावण्याचा विक्रम नोंदविण्यासाठी सज्ज झाले आहेत. नोंदणी अंतिम टप्प्यात आली असून, लवकरात लवकर नागरिक, खेळाडूंनी आपला सहभाग निश्चित करण्याची वेळ आली आहे.

बालगोपाळांपासून वृद्ध आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा चैतन्यपूर्ण सहभाग, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल ही वैशिष्ट्य असणारी महामॅरेथॉन ३ कि. मी., ५ कि. मी. आणि २१ कि. मी. अंतरात होत आहे. तब्बल १२ लाख रुपयांपर्यंत पारितोषिके असणारी ही महामॅरेथॉन नागरिकांसाठी नेहमीच आकर्षण ठरली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे १४ डिसेंबर रोजी होणाऱ्या महामॅरेथॉनमध्ये नागरिकांना कुटुंबांसोबत धावण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. निरोगी आरोग्यासाठी आणि व्यायामाचा श्रीगणेशा करणाऱ्यांसाठीदेखील ही मॅरेथॉन मैलाचा दगड ठरणार आहे. त्यांच्यासाठी ३ व ५ कि. मी. हे अंतर असणार आहे. १२ पेक्षा जास्त वय असणाऱ्यांसाठी ५ कि. मी. अंतराच्या फन रनचाही यात समावेश आहे. तसेच प्रोफेशनल धावपटूंसाठी १० आणि २१ कि. मी. अंतर असणार आहे.

सकारात्मक उपक्रमांना पाठबळलोकमत समूह आयोजित या भव्य ‘महामॅरेथॉन’ उपक्रमाचे टायटल स्पॉन्सर म्हणून सहभागी होताना मला विशेष आनंद आणि अभिमान वाटतो. ‘लोकमत’सोबत जोडले जाणे हे आमच्यासाठी विश्वास, प्रतिष्ठा आणि यशाचे प्रतीक आहे. धावपळीच्या जीवनात समाजाशी नातं जोडणं, सकारात्मक उपक्रमांना पाठबळ देणं आणि वाचकांपर्यंत पोहोचणं ही ‘लोकमत’ची ओळख आहे.-डॉ. विक्रांत भाले, मॅनेजिंग डायरेक्टर, लाइफलाइन मेडिकल डिव्हायसेस प्रा. लि.

सर्वांनी सहभाग नोंदवावालोकमत महामॅरेथॉनचे यंदाचे हे नववे पर्व आहे. निरोगी आयुष्याविषयी जागरूकता निर्माण करणारी ही महामॅरेथॉन आहे. या स्तुत्य उपक्रमाशी आम्ही जोडले गेलेलो आहोत. निरोगी आरोग्य आणि समाजाच्या हिताचे काम करणाऱ्या महामॅरेथॉनमध्ये सर्वांनी भरभरून सहभाग नोंदवावा.- अनिमेष सिंग, मॅनेजिंग डायरेक्टर, मिसेस फूड राइट

सकारात्मक उपक्रमांना साथलोकमत महामॅरेथॉन सिझन नऊचा असोसिएट स्पॉन्सर म्हणून जोडले जाण्याचा आम्हाला अभिमान आहे. लोकमत महामॅरेथॉनद्वारे आरोग्यदायी आणि ऊर्जावान महाराष्ट्राच्या अभियानात सहभागी होऊन आनंद वाटतो. नवकार टाइल्स आणि ग्रॅनाइट सदैव सकारात्मक उपक्रमांना साथ देत राहील.-सागर पाटणी, डायरेक्टर, नवकार टाइल्स अँड ग्रॅनाइट

English
हिंदी सारांश
Web Title : Lokmat Mahamarathon: Aurangabad Gears Up for Record Run.

Web Summary : Aurangabad is set to host the 9th Lokmat Mahamarathon on December 14th. The event features 3km, 5km, 10km, and 21km races with prizes up to ₹12 lakh. It promotes health, fitness, and community participation for all ages and skill levels.
टॅग्स :Marathonमॅरेथॉनchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरLokmatलोकमत