शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

थरारक! मध्यरात्री ढाब्यावर मारहाण करत रोकड लुटणाऱ्या तिघांना पाठलाग करून पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 11:56 IST

तिन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर शहरात सुध्दा अनेक गुन्हे दाखल आहेत.

कायगाव : छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगर महामार्गावरील भेंडाळा फाटानजीक ढाबा मालकाला मारहाण करत चोरट्यांनी गल्ल्यातील ९ हजार ७०० रुपयांची चोरी केल्याची घटना बुधवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास झाली. चोरीची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी पाठलाग करत तिन्ही चोरट्यांना अवघ्या तीन तासातच जेरबंद केले.

याबाबत गंगापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास भेंडाळा फाट्यानजीक महाराष्ट्र ढाब्यावर तिघेजण  घुसले. कॅश काउंटर जवळ झोपलेले हॉटेल मालक फेरोज सांडू शेख (रा. ढोरेगाव) यांना लोखंडी सळईने मारहाण केली. तसेच चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने गल्यातील ९ हजार ७०० रूपये रोख काढून घेतले. त्यानंतर तिन्ही चोरटे दुचाकीवरून  (एमएच- २०- डीपी- ५६४६) पसार झाले. याबाबत हॉटेल मालक फेरोज सांडू शेख यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोनि. सत्यजीत ताईतवाले पथकासह तात्काळ घटनास्थळी पोहोचले. तिन्ही चोरटे छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने सुसाट वेगात गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सर्व रस्त्यांवर नाकाबंदी केली. पोनि. ताईतवाले पथकासह शोध घेत असताना अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरिल ईसारवाडी फाट्यानजीक एका बंद पेट्रोलपंपजवळ काही जणांची संशयित हालचाल निदर्शनास आली. पोलीसांनी वाहन दूर उभे करत पेट्रोलपंपाच्या दिशेने धाव घेतली. 

यावेळी धाब्यावर चोरी करून पसार झालेले चोरटे आणि त्यांची दुचाकी आढळून आली. पोलिसांनी परिसराला घेराव घातला. मात्र, चाहूल लागल्याने आरोपींनी अंधाराचा फायदा घेत शेतात पळ काढला. पोलीसांनी देखील अंधारात चोरट्यांचा पाठलाग केला. तिन्ही आरोपींना पोलिसांनी पहाटे ४.३० वाजता शिताफिने मुसक्या आवळून जेरबंद केले.

तपासात  आरोपींची नावे जुबेर नासेर शेख, शेख ईरफान सरवर, रिझवान पाशेखान (सर्व रा. नेहरूनगर, कटकटगेट, हत्तीसिंगपुरा, छत्रपती संभाजीनगर) असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी ढाब्यावर चोरी केल्याचे कबूल केले. त्यांच्या ताब्यातुन चोरून नेलेले ९ हजार ७०० रूपये रोख, तीन मोबाईल, दुचाकी, चाकू असा एकूण ६३ हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

आरोपींच्याविरुध्द गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तिन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर शहरात सुध्दा अनेक गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोनि. सत्यजीत ताईतवाले, उपनिरीक्षक अजहर शेख, पोलीस अंमलदार दिनकर थोरे, गंगावणे, अभिजीत डहाळे, अमोल कांबळे, तेनसिंग राठोड यांनी केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस