शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

थरारक ! हॉटेलचालकावर चाकूहल्ला करून पळून जाणाऱ्या टोळीस पाठलाग करून पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 1:28 PM

Crime News Aurangabad : रविवारी रात्री नांदराबाद येथील (कागजीपुऱ्याच्या अगोदर) हॉटेलचालक अक्षय बोडखे यांच्यासोबत या चौघाजणांची बाचाबाची झाली.

ठळक मुद्देअटकेतील चौघेजण सराईत गुन्हेगार  दौलताबाद पोलिसांची धाडसी कारवाई

औरंगाबाद : हॉटेलचालकावर चाकूहल्ला करून तवेरा कारमधून पळून जाणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीला दौलताबादच्या पोलिसांनी पाठलाग करून माळीवाडा येथे पकडले. हा थरार रविवारी रात्री घडला असून जखमी हॉटेलचालकास पोलिसांनी उपचारासाठी घाटीत दाखल केले आहे.

साहिल हारुण सय्यद ऊर्फ भुऱ्या (१८, रा. राजनगर, मुकुंदवाडी), अशोक रावसाहेब लगोटे (२३, रा. राजनगर, मुकुंदवाडी), भारत सुदाम कांबळे (३७, रा. कैकाडी मोहल्ला, जुना जालना) व संकेत राजू खंडागळे (२२, रा. कबीरनगर, उस्मानपुरा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

रविवारी रात्री नांदराबाद येथील (कागजीपुऱ्याच्या अगोदर) हॉटेलचालक अक्षय बोडखे यांच्यासोबत या चौघाजणांची बाचाबाची झाली. त्यानंतर त्यांनी चाकूने अक्षयवर हल्ला करून त्याच्याजवळील पैसे घेऊन ते पळून गेले. यामध्ये अक्षयच्या मांडीवर चाकूने वार केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला.दरम्यान, दौलताबाद ठाण्याचे उपनिरीक्षक रविकिरण कदम हे घाट गेटजवळ नाकाबंदी करीत होते. त्यावेळी तेथून सुसाट तवेरा कार निघून गेली. काहीवेळाने मागून दुचाकीवर पाठीमागे बसून अक्षय बोडखे आला व त्याने ही घटना सांगितली. क्षणाचाही वेळ न दवडता उपनिरीक्षक कदम यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह तवेरा कारचा (एमएच ०४- इएस- ३४६५) पाठलाग सुरू केला.

त्यावेळी माळीवाडा येथे नाकाबंदीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही कार अडवली व त्यातील चौघांच्याही मुसक्या आवळल्या. ही घटना खुलताबाद ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे हा गुन्हा तिकडे वर्ग करण्यात आला आहे.यातील सय्यद साहिल ऊर्फ भुऱ्या हा बालपणापासून गुन्हेगारी सवईचा आहे. त्याच्यावर ३ गुन्हे दाखल असून अशोक लगोटे हा देखील सराईत गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्याविरुद्ध क्रांती चौक ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :ArrestअटकAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी