जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा ठरताहेत रोमहर्षक

By Admin | Updated: September 11, 2014 00:22 IST2014-09-11T00:15:22+5:302014-09-11T00:22:55+5:30

बीड: येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर सध्या शालेयस्तरावरील विविध गटांत विविध स्पर्धा घेण्यात येत आहेत.

Thrillers are going to be the district level sports competition | जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा ठरताहेत रोमहर्षक

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा ठरताहेत रोमहर्षक

बीड: येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर सध्या शालेयस्तरावरील विविध गटांत विविध स्पर्धा घेण्यात येत आहेत. या सर्वच स्पर्धेतील सामने रोमहर्षक ठरत असून क्रीडाप्रेमींचे मनोरंजन होत आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सध्या जिल्हास्तरीय विविध स्पर्धा घेण्यात येत आहेत. बुधवारी १४ वर्ष वयोगटातील तायक्वांदो, १९ वर्ष वयोगटातील सॉफ्टबॉल स्पर्धा घेण्यात आल्या. तायक्वांदो स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी निलीमा आडसूळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तायक्वांदोचे सामनाधिकारी अविनाश बारगजे यांची उपस्थिती होती. तर सॉफ्टबॉल स्पर्धेचे उद्घाटन बीड जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रा. दिनकर थोरात, क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, अबीब सय्यद, प्रा.चौरे, के.जे.शेख, श्रीनिवास सानप, एस.आर.सोनवणे, प्रा.भीमा माने, राजेंद्र डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तायक्वांदोमध्ये सुमारे २५० विद्यार्थ्यांचा सहभाग
सकाळी १० वाजता येथील बॅडमिंटन हॉलमध्ये क्रीडा कार्यालयाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या १४ वर्ष वयोगटातील तायक्वांदो स्पर्धेला सुरूवात झाली. या स्पर्धेत सुमारे २५० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेच्या सुरूवातीपासूनच विद्यार्थ्यांनी आक्रमक खेळ करण्यास सुरूवात केली. एक एक पॉर्इंट घेण्यासाठी खेळाडू एकमेकांना तुटून पडत होते. गुरूवारी १९ वर्ष वयोगटातील खेळाडूंचे सामने होणार असल्याचे मुख्य सामनाधिकारी अविनाश बारगजे यांनी सांगितले.
सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते अंतराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केलेले खेळाडू पूजा मोरे, दिक्षा बनकर, शुभम गायकवाड, राम धन्वे यांचा सत्कार करण्यात आला. पंच म्हणून अविनाश पांचाळ, जयश्री बारगजे, अनिल गायकवाड, बन्सी राऊत, शेख अनिस, कृष्णा उगलमुगल आदींनी काम पाहिले.
सॉफ्टबॉलमध्ये मुली आक्रमक
सॉफ्टबॉल स्पर्धेत मुलांपेक्षा मुलींनी आक्रमक खेळ केला. सचिन जाधव, मिलींद अंधारे, रेवनाथ शेलार, किशोर काळे, मोनिका बेदरे, श्रीराम इंगळे यांनी पंच म्हणून काम पाहिले. (प्रतिनिधी)

Web Title: Thrillers are going to be the district level sports competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.