भारतमातेच्या देखाव्याने उभारले शरीरावर रोमांच
By Admin | Updated: September 6, 2014 00:28 IST2014-09-05T23:57:27+5:302014-09-06T00:28:46+5:30
परभणी : स्त्रीभ्रूण हत्या, बेरोजगारी, अंधश्रद्धा, यासारख्या सामाजिक प्रश्नांवर प्रबोधन करणारा ‘भारत माता करती पुकार’ हा देखावा भजन गल्लीतील श्री जवाहर गणेश मंडळाने साकारला आहे.

भारतमातेच्या देखाव्याने उभारले शरीरावर रोमांच
परभणी : स्त्रीभ्रूण हत्या, बेरोजगारी, अंधश्रद्धा, यासारख्या सामाजिक प्रश्नांवर प्रबोधन करणारा ‘भारत माता करती पुकार’ हा देखावा भजन गल्लीतील श्री जवाहर गणेश मंडळाने साकारला आहे. आपल्याच देशातील या समस्यांनी किती गंभीर स्वरुप धारण केले आहे, हे पाहताना अंगावर रोमांच उभे राहतात.
देशात निर्माण झालेली बेरोजगारी, मुलगी नको म्हणून होणारी स्त्रीभ्रूण हत्या, अंधश्रद्धा, लहान मुले गुन्हेगारीकडे कशी वळतात, अशा विविध समस्या एकाच मंचावरुन मांडण्याचे कसब या मंडळाने दाखविले आहे. भारत माता करती पुकार, दूर करा अत्याचार, या आशयाचा हा देखावा आहे. वरील सामाजिक प्रश्नांनी भारत मातेवर कसे अत्याचार होत आहेत आणि ते रोखण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील, हे या सजीव देखाव्यातून मांडण्यात आले आहे. नाटिकेच्या माध्यमातून या समस्या लोकांसमोर दाखविण्यात आल्या असून त्यावर विचार करण्यास भाग पाडले जाते. श्री जवाहर गणेश मंडळ ६९ वर्षांपासून भजन गल्लीत श्रींची स्थापना करते. १९८२ पासून वेगवेगळ्या विषयावर देखावे उभारुन प्रबोधनाचे काम या मंडळाने केले आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा वसा मंडळाने घेतला आहे. मनपाचे गटनेते दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष बंटी लुबाळे, कुणाल पाचपोर, विनायक लुबाळे, प्रमोद सुरवसे, कैलास संघई, चेतन काळे, पप्पू शिंदे, राहुल शहाणे, अतुल लोंढे, अनिल कुल्थे व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. (प्रतिनिधी)