शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनासाठी आलेले तीन तरुण धारकुंड तलावात बुडाले; पावसामुळे शोध कार्यात अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 00:15 IST

जळगाव जिल्ह्यातील नऊ तरुण दुचाकीवर धारकुंड येथे पर्यटनासाठी आली होती.

सोयगाव : पर्यटनासाठी जळगाव जिल्ह्यातून आलेली तीन तरुण पाण्यात धारकुंड येथील तलावात बुडल्याची धक्कादायक घटना (बनोटी, ता. सोयगाव  रविवारी (दि.०९) सायंकाळी घडली. रात्रीची वेळ आणि पाऊस चालू असल्याने शोध कार्यात अडथडा येत आहे. रात्री उशिरापर्यंत एकाचाही शोध लागला नव्हता. यामुळे सोमवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

राकेश रमेश भालेराव ( २५, गोदावरी काॅलनी ) राहुल चौधरी (२३, हनुमान नगर ),  गणेश भिकन सोनवणे ( २३, राधानगरी जारगांव जि. जळगाव) असे बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. बनोटी गावापासुन सात किलोमीटर अतंरावर धारकुड हे धार्मीक स्थळ आहे ह्या ठिकाणी तीनशे फुटावरुन कोसळणारा धबधबा पर्यटक, भाविकांचे आकर्षण ठरत आहे. बाजुला खडकामध्ये महादेवाची पिंड आहे. येथील धोधो कोसळणार्‍या धारेखाली अंघोळ करण्याचा मोह आवरता येत नसल्याने येथे नेहमी दुर्दैवी घटना घडतात. श्रावण महीन्यात नेहमी भाविकांची याठिकाणी गर्दी होत असते.  जळगाव जिल्हातील नऊ मित्र रविवारी सकाळी बारा वाजेच्या सुमारास दुचाकीने या ठिकाणी आले होते.तेथील मनमोहक धबधबा आणि नैसर्गिक सौंदर्याचा सर्व जण मनसोक्त आनंद घेत होते.

तब्बल दोन तास झाल्यानंतर घराकडे निघण्याच्या तयारीत असतांना तीन जण गायब असल्याचे लक्षात आले.  जमलेले पर्यटक आणि सहा मित्रांनी शोधाशोध करुनही मिळाले नाहीत, यातच अंधार पडत असल्याने विष्णू बारी, समाधान बारी, राजेश चौधरी, काकासाहेब लोंढे, अजिंक्य सोळके आणि निलेश अहीरे या मित्रांनी बनोटी दुरक्षेत्र गाठून घटनेची माहिती दिली. यानंतर ठाणे अंमलदार सुभाष पवार, सतीश पाटील, दिपक पाटील, विकास दुबीले यांनी घटनास्थळी धाव घेतली.  मात्र, काळोख आणि पावसामुळे शोध कार्यात अडथळा येत आहे. यामुळे सोमवारी सकाळी परत शोध कार्य सुरू करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdrowningपाण्यात बुडणेJalgaonजळगाव