कंपन्यांना माहिती तंत्रज्ञानाची सुविधा पुरविण्याचा मराठवाड्यातील तीन तरुण उद्योजकांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:02 IST2021-04-09T04:02:51+5:302021-04-09T04:02:51+5:30

प्रेरणादायी : स्थानिक युवकांना आयटी क्षेत्रात मोठी संधी औरंगाबाद : औरंगाबाद औद्योगिक हब बनले आहे. येथून देशातच नव्हे तर ...

Three young entrepreneurs from Marathwada decide to provide information technology facilities to companies | कंपन्यांना माहिती तंत्रज्ञानाची सुविधा पुरविण्याचा मराठवाड्यातील तीन तरुण उद्योजकांचा निर्धार

कंपन्यांना माहिती तंत्रज्ञानाची सुविधा पुरविण्याचा मराठवाड्यातील तीन तरुण उद्योजकांचा निर्धार

प्रेरणादायी : स्थानिक युवकांना आयटी क्षेत्रात मोठी संधी

औरंगाबाद : औरंगाबाद औद्योगिक हब बनले आहे. येथून देशातच नव्हे तर जगभरात उत्पादने पाठवली जातात. मात्र, अजूनही आयटी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तेवढी गुंतवणूक केली जात नाही. येथील कंपन्यांमध्ये आयटी जगतातील अद्ययावत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, त्यांच्या कामाची गुणवत्ता वाढविणे तसेच वेळेची व पैशाची बचत करण्यासाठी मराठवाड्यातील तीन तरुण उद्योजकांनी निर्धार केला व त्याची अंमलबजावणी चार वर्षांपासून यशस्वीपणे करत आहेत. त्याला मध्यम व मोठ्या उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्राकडून मोठा प्रतिसाद मिळत आहेत.

एवढेच नव्हेतर मराठवाड्यातील आयटीचे शिक्षण घेणाऱ्या बुद्धिमान विद्यार्थ्यांना औरंगाबादतेच संधी उपलब्ध करून देण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. या आयटी क्षेत्रात उच्चशिक्षित, आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये आयटी व्यवस्थापनातील १५ ते २० वर्षांचा उच्च दर्जेचा अनुभव असलेले हे तरुण उद्योजक आहेत.

''इनोविन ग्लोबल सोल्युशन प्रा.लि.चे संचालक संदीप लहानगे, झुबेर सय्यद व रवींद्र गायकवाड हे होय.

जालनारोडवरील विद्यानगर येथील आयडीबीआय बँकेच्या वरती इनोविन ग्लोबल सिस्टीम प्रा. लि.चे ऑफिस आहे. आजही कंपन्यामध्ये आयटीमध्ये (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) काही अडचणी आल्या तर येथील व्यवस्थापन पुणे-मुंबई येथील आयटी एक्सपर्टला बोलवतात. जगभरात उत्पादने निर्यात करणाऱ्या येथील कंपन्याकडे आयटी संदर्भात योग्य सोल्युशन देणारे कोणीही नाही, ही खंत नेहमी या तिघांच्या मनात होती. अखेर राष्टीय-आंतरराष्ट्रीय कंपनीतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून त्यांनी शहरात २०१७ मध्ये लाभ चेंबर्स येथे अवघ्या १० बाय २० फुटांच्या खोलीत 'इनोविन ग्लोबल सोल्युशन'ला सुरुवात केली.

आपल्या आयटी व्यवस्थापनातील उच्चदर्जेचा दीर्घ अनुभवाच्या शिदोरीवर त्यांनी कार्यास सुरुवात केली. यासंदर्भात संचालक संदीप लहानगे यांनी सांगितले की, मुळात आमचे ध्येय हेच होते की, आयटीतील कोणतीही समस्या असो त्याचे योग्य निराकरण करायचे. कंपनीच्या आवश्यकतेनुसार तेवढेच सोल्युशन द्यायचे. अतिरिक्त खर्चात न टाकता त्यांचा वेळ व पैसा कसा वाचले व कामही गुणवत्तापूर्ण कसे होईल यावर आम्ही लक्ष केंद्रित केले. जगात आयटी क्षेत्रातील अद्ययावत टेक्नॉलॉजी लगेच औरंगाबादमधील कंपन्यांत कशी उपलब्ध होईल, यावर आमचा कायम भर असतो. येथील कार्याच्या आधारावर मुंबईतील उद्योगाकडून मागणी वाढली त्यानुसार आम्ही २०१८ मध्ये मुंबईत व त्यानंतर २०२० मार्च आधी पुण्यात आमचे ऑफिस सुरू केले. २०१८ मध्ये आम्ही 'इनोविन ग्लोबल सोल्युशन'चे रूपांतर 'इनोविन ग्लोबल सिस्टीम प्रा. लि.' मध्ये केले.

( जोड )

Web Title: Three young entrepreneurs from Marathwada decide to provide information technology facilities to companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.