तीन वर्ष झाली, लाभार्थ्यांना घरकुलाची परवानगी मिळेना

By Admin | Updated: August 9, 2014 00:39 IST2014-08-09T00:22:28+5:302014-08-09T00:39:35+5:30

लोहा : सन २०१०-११ मध्ये शासनामार्फत दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना रमाई घरकुल आवास योजना अंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले़

Three years have passed, beneficiaries get the permission of the house clerk | तीन वर्ष झाली, लाभार्थ्यांना घरकुलाची परवानगी मिळेना

तीन वर्ष झाली, लाभार्थ्यांना घरकुलाची परवानगी मिळेना


लोहा : सन २०१०-११ मध्ये शासनामार्फत दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना रमाई घरकुल आवास योजना अंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले़ मात्र जवळपास तीन वर्षे उलटून देखील घरकुल पात्र लाभार्थ्यांना बांधकामासाठी ऩ प़ कडून परवानगी मिळाली नसल्यामुळे संतप्त पात्र लाभार्थी काँग्रेस नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली ऩ प़ कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे़
अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांसाठी व दारिद्रय रेषेअंतर्गत कुटुंबासाठी त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य शासनामार्फत उदात्त हेतूने रमाई घरकुल आवास योजना कार्यान्वित करण्यात आली़ त्या अंतर्गत लोहा ऩ प़ क्षेत्रात सदरील योजना सन २०१०-११ मध्ये राबविण्यात आली़ त्यामध्ये शेकडो घरकुल ऩ प़ च्या वतीने मंजूर करण्यात आले़ मात्र पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होवून जवळपास तीन वर्षाचा कालावधी उलटून देखील काही मंजूर लाभार्थींना अद्याप ऩ प़ च्या बांधकाम विभागाकडून बांधकाम करण्यास परवानगी मिळाली नसल्यामुळे नगर परिषदेच्या तुघलकी कारभाराविरोधात ऩ प़ चे बांधकाम सभापती पंकज परिहार, नगरसेवक शंकर पाटील कऱ्हाळे, रिपाइंचे बबन निर्मले यांच्या नेतृत्वाखाली लाभार्थी १९ आॅगस्टपासून आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.(वार्ताहर)

Web Title: Three years have passed, beneficiaries get the permission of the house clerk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.