विनयभंग प्रकरणी चालकास तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
By Admin | Updated: March 18, 2017 23:16 IST2017-03-18T23:09:37+5:302017-03-18T23:16:07+5:30
माजलगाव : धावत्या जीपमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या धुनकवड (ता. धारुर) येथील चालकाला सत्र न्या. एम. व्ही. मोराळे यांनी तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

विनयभंग प्रकरणी चालकास तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
माजलगाव : धावत्या जीपमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या धुनकवड (ता. धारुर) येथील चालकाला सत्र न्या. एम. व्ही. मोराळे यांनी तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. शुक्रवारी न्यायालयाने हा निर्णय दिला.
१५ वर्षीय पीडित मुलगी ३० जुलै २०१६ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास तिच्या चुलत बहिणीसोबत रवि शिवाजी यादव याच्या जीपमधून शेतात जात होत्या. यावेळी रवि यादव याने मुलीचा हात पकडून तिच्याशी गैरवर्तन केले. त्यामुळे पीडितेने गाडीतून उडी टाकली. त्यानंतरही त्याने तिचा पाठलाग केला. याप्रकरणी मुलीने धारूर ठाण्यात फिर्याद नोंदवली. तपासानंतर पोलिसांनी आरोपीविरूध्द माजलगाव येथील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्या. एम. व्ही. मोराळे यांनी आरोपी रवि यादव यास बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम ८ नूसार दोषी ठरवून ३ वर्षे सक्त मजुरी व एक हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील बी.एस. राख यांनी काम पाहिले. त्यांना सहायक सरकारी वकील अजय तांदळे व आर.ए. वाघमारे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)