सेलूत सापडला तीन वर्षांचा बालक
By Admin | Updated: September 11, 2014 00:02 IST2014-09-10T23:42:51+5:302014-09-11T00:02:13+5:30
परभणी : सेलू येथील रेल्वेस्थानकावर तीन वर्षाचा बालक आढळला

सेलूत सापडला तीन वर्षांचा बालक
परभणी : सेलू येथील रेल्वेस्थानकावर तीन वर्षाचा बालक आढळला असून, त्याची ओळख पटलेली नाही. त्यामुळे या बालकास सध्या परभणीच्या आशा शिशूगृहात दाखल केले आहे.
सेलू रेल्वेस्थानकावर ८ सप्टेंबर रोजी तीन वर्षांचा बालक आढळला. त्यास सुरुवातीला सेलू पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी या मुलाची नोंदणी करुन त्यास बालकल्याण समितीचे अध्यक्ष आणि चाईल्ड लाईनच्या माध्यमातून आशा शिशूगृहात दाखल केले आहे. ओळखीसाठी या मुलाचे नाव किरण असे ठेवण्यात आले आहे. दोन ते तीन वर्षे वयाचा हा मुलगा असावा. सावळ्या रंगाचा असून, त्याचे कपाळ मोठे आहे. केस काळे असून, चेहरा गोल आहे. या मुलाने हिरव्या रंगाचे स्वेटर, निळ्या रंगाचा शर्ट आणि तपकिरी रंगाची टोपी परिधान केलेली आहे. या मुलाच्या नातेवाईकांविषयी कोणाला माहिती असल्यास त्यांनी परभणी येथील बाल कल्याण समितीचे अध्यक्ष, आशा शिशूगृहाचे अधीक्षक किंवा चाईल्ड लाईनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)