शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

आईच्या मागे रस्ता ओलांडणाऱ्या तीनवर्षीय बालकाला ट्रकने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 19:22 IST

या भीषण अपघातात बालक रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून संतप्त नागरिकांनी ट्रकचालकला बेदम मारहाण केली

ठळक मुद्देजमावाने हायवा ट्रकवर केली दगडफेक

औरंगाबाद : आईच्या मागे रस्ता ओलांडणाऱ्या तीनवर्षीय बालकाला हायवा ट्रकने चिरडल्याची घटना पैठण रोडवरील नक्षत्रवाडी गावात सोमवारी दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास घडली. याविषयी सातारा ठाण्यात ट्रकचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.

संघर्ष लक्ष्मण पागोरे (३, रा.नक्षत्रवाडी), असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेत संघर्षची आई चांदणी पागोरे या जखमी झाल्या असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सातारा पोलिसांनी सांगितले की, नक्षत्रवाडी येथील रहिवासी चांदणी लक्ष्मण पागोरे या मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास त्या मुलगा संघर्षसह पैठण रोड ओलांडत होत्या. त्यावेळी पैठणकडून खडी घेऊन जाणाऱ्या सुसाट ट्रकने त्यांना धडक दिली. या घटनेत संघर्ष ट्रकच्या चाकाखाली आल्याने घटनास्थळीच ठार झाला, तर चांदणी यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली.

या भीषण अपघातात बालक रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून संतप्त नागरिकांनी ट्रकचालकला बेदम मारहाण केली आणि ट्रकवर दगडफेक केली. या घटनेची माहिती मिळताच सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल पोटे, उपनिरीक्षक सिरसाट आणि वाहतूक शाखेचे निरीक्षक दादासाहेब सिनगारे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जमावाच्या तावडीतून ट्रकचालकाला ताब्यात घेतले, तसेच मृत चिमुकल्याचा मृतदेह आणि जखमी चांदणी यांना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. 

चालकाला अटकयाविषयी मृत संघर्षचा चुलतभाऊ नितेश दादासाहेब पागोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रकचालक सय्यद ख्वाजा नबी हसन (२७, रा. नवनाथनगर) याच्याविरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. मारहाणीत जखमी झालेल्या ट्रकचालकावर घाटीत उपचार केल्यानंतर त्याला अटक केली.

जमावाने हायवा ट्रकवर केली दगडफे कहायवा ट्रकने चिमुकल्याला चिरडल्याचे समजताच नक्षत्रवाडीतील संतप्त नागरिक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी जमावाने दगडफेक केल्याने ट्रकच्या केबिनच्या काचा फुटल्या. शिवाय वाहतूककोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी रस्त्यावरील अपघातग्रस्त हायवा ट्रक जप्त केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद