सराफा दुकानात चोरी करणाऱ्या तीन महिलांना पकडले
By Admin | Updated: July 7, 2014 00:02 IST2014-07-07T00:02:48+5:302014-07-07T00:02:48+5:30
तामसा : येथील आठवडी बाजारात गर्दीचा फायदा घेत सराफा दुकानात घुसून चोरी करण्याच्या उद्देशाने शिरलेल्या संशयित तीन महिलांना दुकानदाराने पकडून पोलिसांच्या हवाली केले़

सराफा दुकानात चोरी करणाऱ्या तीन महिलांना पकडले
तक्रारीवर कारवाईस चालढकल : मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्र
पुलगाव : शेतातील अंदाजे २० ते ३० वर्षे जुनी ३० झाडे विनापरवाना तोडून नेले़ याबाबत शासनाच्या संबंधित सर्व विभागांकडे शेतकऱ्याने तक्रारी केल्या़ विभागीय आयुक्तांनी तलाठ्यास चौकशीचे आदेश दिलेत; पण भ्रष्ट व मुजोर महसूल विभागाने आयुक्तांच्या पत्रालाही केराची टोपली दाखविली़ चार महिन्यांपासून न्याय मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे आत्महत्येची परवानगी मागितली आहे़
दारासिंग उत्तरसिंग ठाकूर यांचे वर्धा नदीच्या काठावर मौजा गुंजखेडा येथे सर्वे क्ऱ ३६३/१ मधील शेतातील सुबाभुळ, उंबर, पळस, चिचबिलाई, कडूनिंब आदी प्रजातीची झाडे गिरीजाप्रसाद पांडे यांनी तोडून केली़ याबाबत त्यांनी चार महिन्यांपूर्वी तक्रार केली. महसूल विभागाने या प्रकरणी कुठलीही चौकशी केली नाही़ यामुळे ठाकूर यांनी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, मुख्यमंत्री, वन विभाग, पोलीस ठाणे यांच्याकडे सर्व पुराव्यांसह तक्रारी केल्यात; पण सुस्त प्रशासनाने कागदी घोडे दामटविण्यापलीकडे प्रत्यक्ष कारवाई केलीच नाही. यामुळे पांडे यांनी तोडलेली झाडे त्वरित लंपास करून उर्वरित झाडे पुन्हा तोडण्यास सुरुवात केल्याचे म्हटले आहे. ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतरही पटवाऱ्याने पंचनामा केला नाही.
या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश विभागीय आयुक्तांनी २२ मे रोजी महसूल विभागास दिले; पण त्यांनी त्या पत्राची दखलही घेतली नाही. ठाकूर गत चार-पाच महिन्यांपासून शासन दरबारी तक्रारी करून त्रस्त झालेत़ वृक्षतोडीमुळे त्यांचे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मुजोर प्रशासन आयुक्तांच्या पत्राला दाद देत नसतील तर न्याय कोण देणार, गुन्हेगारांस दंडित कोण करणार, असा प्रश्नही शेतकऱ्याने उपस्थित केला आहे़ न्यायाची आशा धुसर झाल्याने त्यांनी मुख्यमंत्री, पंतप्रधान यांना पत्रातून ‘आता मी आत्महत्या करू काय’, असा थेट सवाल केला आहे़(शहर प्रतिनिधी)