शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

व्हाइटनरच्या नशेत तरुणाने रोखल्या तीन रेल्वे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 04:41 IST

व्हाइटनरची नशा करून आत्महत्येसाठी रेल्वे रुळावर आलेल्या तरुणामुळे औरंगाबादेत तीन रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले.

औरंगाबाद : व्हाइटनरची नशा करून आत्महत्येसाठी रेल्वे रुळावर आलेल्या तरुणामुळे औरंगाबादेत तीन रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले. नागरिकांनी समजूत काढूनही तरुण रेल्वे रुळाकडे जात असल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले.व्हाइटनर प्राशन केलेला एक तरुण आत्महत्या करण्यासाठी औरंगाबादमधील देवानगरी येथील रेल्वे क्रॉसिंग गेटजवळ आला. परिसरातील नागरिकांनी त्या तरुणाला रोखण्याचे प्रयत्न केले. रेल्वे रुळावर गर्दी दिसल्याने येत असलेली ओखा-रामेश्वरम एक्स्प्रेस थांबवण्यात आली. यादरम्यान, नागरिकांनी तरुणांची समजूत काढली. घरी जातो, असे सांगून तो घटनास्थळावरून निघून गेला. मात्र, थोड्या वेळाने पुन्हा तेथे आला. या वेळी नगरसोल-नांदेड गाडी जात असताना समोर येऊन उभा राहिला. रेल्वे थांबवून काही जणांनी त्याची समजूत काढली. तो परत गेला आणि थोड्या वेळाने मनमाड-काचिगुडा रेल्वे गाडीसमोर येऊन थांबला. त्यानंतर नागरिक आणि प्रवाशांनी पोलिसांना संपर्क करून घटनेची माहिती दिली.पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेईपर्यंत हा गोंधळ सुरूच होता. या तरुणाकडील जवळपास चार हजार रुपये आणि मोबाइल काही मुलांनी काढून घेतला. तसेच त्याच्या अंगावर खाज येणारी काचकुरीही टाकली, असे त्या तरुणाने चौकशीत सांगितले. त्यामुळेच तो आत्महत्या करण्यासाठी रेल्वेरुळावर आला होता.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वे