शहरात तीन टॉवर सील
By Admin | Updated: April 3, 2017 23:16 IST2017-04-03T23:14:59+5:302017-04-03T23:16:43+5:30
जालना : नगर पालिकेने शहरातील तीन खाजगी कंपनीचे मोबाईल टॉवर सोमवारी सील केले

शहरात तीन टॉवर सील
जालना : नगर पालिकेने शहरातील तीन खाजगी कंपनीचे मोबाईल टॉवर सोमवारी सील केले. तीनही टॉवर अनधिकृत असल्याचे मालमत्ता कर विभागातून सांगण्यात आले.
शहरातील गोपीकिशन नगर, अंबड रोड , योगेश्वरी नगर येथील तीन मोबाईल टॉवर सील करण्यात आले. टॉवर चालकांकडे वारंवार पाठपुरावा करूनही संबंधितांनी प्रतिसाद न दिल्याने सोमवारी सदर टॉवर सील करण्यात आले.
तीन टॉवरकडे २० लाखांची थकबाकी तर ४० लाख रूपये दंड लावण्यात आला आहे. एकूण ६० लाखांची थकबाकी आहे. कराची थकबाकी तसेच दंड भरल्याशिवाय सील उघडण्यात येणार नसल्याचे कर अधीक्षकंनी सांगितले. दरम्यान, शहरातील अनेक ठिकाणी अनधिकृत टॉवर असून, महिन्याकाठी लाखो रूपयांचा महसूल बुडवत आहेत. अशा टॉवरवरही विशेष पथकाच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)