तीन हजार मतदार ‘डाटा एन्ट्री’त अडकले

By Admin | Updated: October 20, 2016 01:15 IST2016-10-20T01:15:45+5:302016-10-20T01:15:45+5:30

सुरेश चव्हाण , कन्नड निवडणूक विभागाने निर्धारित केलेल्या मतदार पुनरिक्षण कार्यक्रमानुसार मतदारांनी नावनोंदणीसाठी निवडणूक विभागाकडे अर्ज दाखल केले.

Three thousand voters got stuck in 'Data Entry' | तीन हजार मतदार ‘डाटा एन्ट्री’त अडकले

तीन हजार मतदार ‘डाटा एन्ट्री’त अडकले


सुरेश चव्हाण , कन्नड
निवडणूक विभागाने निर्धारित केलेल्या मतदार पुनरिक्षण कार्यक्रमानुसार मतदारांनी नावनोंदणीसाठी निवडणूक विभागाकडे अर्ज दाखल केले. मात्र त्यापैकी सुमारे ३ हजार मतदार ‘डाटा एन्ट्री’त अडकल्याने त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट झालेली नाही.
निवडणूक विभागाने सन २०१६ चा मतदार पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार नवीन नाव समाविष्ट करणे, स्थलांतर अथवा वगळणी करण्यासाठी ३० सप्टेंबर ही अंतिम तारीख दिली होती. त्यानुसार मतदारांनी अर्ज दाखल केले. मात्र यादी प्रकाशित झाल्यानंतर काही नावे मतदारयादीत आलीच नाहीत. त्यामुळे खळबळ उडाली. अनेकजणांनी याबाबत तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात चौकशी केली. डाटा एन्ट्री होऊ न शकल्याने ही नावे आली नाहीत असे उत्तर त्यांना
मिळाले.
याबाबत निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार लेकुरवाळे यांनी सांगितले की, निवडणूक विभागाने निर्धारित केलेल्या अंतिम तारखेला दाखल झालेल्या तालुक्यातील सुमारे तीन हजार मतदारांची डाटा एन्ट्री न झाल्याने हा गोंधळ झाला आहे. कन्नड नगर परिषद निवडणुकीसाठीच्या ८४४ मतदारांची डाटा एंट्री झालेली नाही.
ग्रामीण भागातील व शहरातील मिळून सुमारे ३ हजार मतदारांची नावे त्यामुळे मतदार यादीत आली नाहीत. डाटा एन्ट्री करण्यासाठी निवडणूक विभागाचे संकेतस्थळ १० आॅक्टोबरपर्यंत सुरु राहणार होते, मात्र ते २ आॅक्टोबरलाच बंद झाले. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

Web Title: Three thousand voters got stuck in 'Data Entry'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.