तिघांनी घेतली माघाऱ़़
By Admin | Updated: June 14, 2014 01:20 IST2014-06-14T01:18:30+5:302014-06-14T01:20:47+5:30
नांदेड : प्रभाग ९ अ (कैलासनगर) च्या पोटनिवडणुकीत दहापैकी तिघांनी आपले अर्ज मागे घेतले़ उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवारी ३ वाजेपर्यंत मुदत होती़
तिघांनी घेतली माघाऱ़़
नांदेड : प्रभाग ९ अ (कैलासनगर) च्या पोटनिवडणुकीत दहापैकी तिघांनी आपले अर्ज मागे घेतले़ उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवारी ३ वाजेपर्यंत मुदत होती़
नगरसेवक सुधाकर पांढरे यांच्या राजीनाम्यामुळे कैलासनगर प्रभागातील रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक होत आहे़ प्रभागातील सदर जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे़ या निवडणुकीत दहा उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्यानंतर आज अखेरच्या दिवशी उमेश गिरी, अब्दुल रब्ब नियाज महेमूर उर्फ महेमूद, जितेंद्र सुरनर यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले़१४ जून रोजी निवडणूक चिन्ह वाटप तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी तसेच मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध होणार आहे़ २९ जून रोजी मतदान असून ३० जून रोजी मतमोजणी होणार आहे़ (प्रतिनिधी)
नगरसेवक सुधाकर पांढरे यांच्या राजीनाम्याने रिक्त झाले पद
दहा जणांनी केले होते अर्ज