तीन संशयितांना अटक
By | Updated: December 5, 2020 04:05 IST2020-12-05T04:05:19+5:302020-12-05T04:05:19+5:30
============ अपघातप्रकरणी कारचालकावर गुन्हा औरंगाबाद : कारची धडक देऊन दुचाकीस्वाराला जखमी केल्याप्रकरणी पोलिसांनी कार चालक राहुलदेव देविदास ...

तीन संशयितांना अटक
============
अपघातप्रकरणी कारचालकावर गुन्हा
औरंगाबाद : कारची धडक देऊन दुचाकीस्वाराला जखमी केल्याप्रकरणी पोलिसांनी कार चालक राहुलदेव देविदास पाडुळे पाटील ( राहणार देवळाई चौक)याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला . या घटनेत जितेंद्र चंद्रबळी यादव ( रा. सिडको एन - १) हे जखमी झाले.
=======
सेव्हन हिल येथून दुचाकी पळविली
औरंगाबाद: सेव्हन हिल येथे उभी करुन ठेवलेली पंक्चर दुकानदार शेख इफ्तिखार मोहम्मद गुलाम यांची दुचाकी (एम एच २० डी एक्स ३८८४)चोरट्यानी लंपास केली. ही घटना २९ नोव्हेंबर रोजी रात्री घडली. याविषयी पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
=========
टी व्ही सेंटर येथे मोटारसायकल चोरी
औरंगाबाद: टी व्ही सेंटर येथे उभी करून ठेवलेली मोटारसायकल (एम एच २० ए व्ही ४०१२) चोरट्यांनी पळविली. याविषयी बद्रीनाथ गिरीजानाथ चुनके यांनी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.