वैजापूर तालुक्यात तिघांच्या आत्महत्या
By Admin | Updated: April 14, 2016 00:15 IST2016-04-14T00:15:09+5:302016-04-14T00:15:09+5:30
वैजापूर : तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत तीन जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली़ नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून या तिघांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे़

वैजापूर तालुक्यात तिघांच्या आत्महत्या
वैजापूर : तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत तीन जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली़ नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून या तिघांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे़
शहरातील फुलेवाडी रोडवरील लक्ष्मण जगन्नाथ निखाडे (३५) यांनी राहत्या घरी बुधवारी सकाळी सहा वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली.
दुसऱ्या घटनेत संजरपूरवाडी येथील रहिवासी जयपालसिंघ सिंघल (२६) हा गावातील शेतात मृतावस्थेत आढळून आला, तर आघूर येथील बाबूलाल रावसाहेब शिंदे (४२) हे सुद्धा गावातील शेतात मृतावस्थेत सापडले.
मात्र त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही़ येथील उपजिल्हा रुग्णालयात तिघांचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत.