तीन तोतया पोलीस जेरबंद
By Admin | Updated: July 6, 2014 00:24 IST2014-07-05T23:58:48+5:302014-07-06T00:24:53+5:30
उस्मानाबाद : पोलिस दलात भरती करतो म्हणून युवकांची फसवणूक करीत रोख रक्कमेसह सोन्याची लूट करणाऱ्या तिघा तोतया पोलिसांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले

तीन तोतया पोलीस जेरबंद
उस्मानाबाद : पोलिस दलात भरती करतो म्हणून युवकांची फसवणूक करीत रोख रक्कमेसह सोन्याची लूट करणाऱ्या तिघा तोतया पोलिसांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले असून, तिघांविरूध्द येरमाळा पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलिसांनी सांगितले की, उपळाई (ताक़ळंब) येथील विनोद रामेश्वर हरभरे (वय-२२) हा युवक १२ वीत शिक्षण घेत आहे. त्याची १० वीत शिक्षण घेत असलेल्या योगेश रामभाऊ काळे याच्याशी ओळख होती़ योगेश काळे (रा़येरमाळा) व सुधीर मारूती मोरे (रा़तेर) हे दोघे दोन महिन्यांपूर्वी त्यांच्याकडील दुचाकीवरून (क्ऱएम़एच़२३-यू़७३६९) पोलीस गणवेशात विनोद हरभरे याच्याकडे आले होते़ योगेश काळेच्या नेमप्लेटवर वाय़आरक़ाळे सोलापूर एसआरपीएफ ब़ऩ२१४ अशी व सुधीर मारूती मोरे याच्या गणवेशावरील नेमप्लेटवर एस़आऱ मोरे सोलापूर एसआरपीएफ ब़ऩ१६८० अशी नावे होती़ दोघांनी हरभरे याला भेटून आम्ही पोलीस दलात आहोत, असे सांगून निघून गेले़ त्यानंतर १ जुलै रोजी सकाळी ९़३० वाजता विनोद हरभरे व त्याचा भाऊ, आई घरी असताना योगेश काळे, कपिल बाबूराव वाघमारे (रा़शिंगोली), सुधीर मारूती मोरे हे तिघे कारमधून (क्ऱएम़एच़१४-ए़एम़१८९१) त्याच्या घरी आले़ त्यावेळी दिनेश हरभरे यालाही पोलीस भरती करतो, त्याचे मेडिकल करण्यासाठी पैसे लागतात म्हणून ५० हजार रूपयांची मागणी केली़
त्यानंतर योगेश हरभरे याने त्यांच्याकडील १० हजार रूपये व आई वनिता हरभरे यांच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ, गंठण असे दोन तोळ्याचे दागिने योगेश काळे याच्याकडे दिले़ त्यानंतर तिघांनी दिनेश हरभरे याला सोबत नेले़ दिनेश हरभरे यास उस्मानाबाद रूग्णालयात नेवून रक्ताची तपासणी करून घरी आणून सोडले व दोन दिवसांत आॅर्डर आणून देतो, असे म्हणून निघून गेले़ वाट पाहूनही ते तिघे परत न आल्याने विनोद हरभरे व दिनेश हरभरे यांनी त्या तिघांची माहिती घेतली त्यावेळी समाधान शेंडगे, मच्छिंद्र शेंडगे (रा़उपळाई) यांच्याकडून ते तोतया पोलीस असल्याची माहिती मिळाली़ तसेच पोलीस नसतानाही अशाच प्रकारे पोलीस असल्याची बतावणी करून दिशाभूल करीत अनेकांकडून पैसे लुटल्याचे समजले़ त्यानंतर विनोद हरभरे यांनी गुन्हे शाखेस याबाबत माहिती दिली़
यावरून पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवून तिघांना अटक केली असून, या प्रकरणी येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : पैशांसह दागिनेही केले जप्त
पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोनि माधव गुंडीले, सपोनि एम़टी़जाधव पथकातील पोहेकॉ शरद घुगे, राजेंद्र वाघमारे, निरगुडे, पोकॉ आनंद ताटे, पोतदार आदी कर्मचाऱ्यांनी या तिघा तोतया पोलिसांना येरमाळा येथून अटक केली़ त्यांच्याकडे चौकशी करून त्यांनी आमिष दाखवून घेतलेले पैसे, दागिने जप्त केले़