पडेगाव रोङवर दोन अपघातांत तीन जण ठार
By Admin | Updated: July 7, 2015 00:56 IST2015-07-07T00:35:50+5:302015-07-07T00:56:40+5:30
औरंगाबाद : भरधाव कारने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण घटनास्थळीच ठार झाले. हा अपघात नाशिक महामार्गावरील पडेगाव येथील राणा पेट्रोलपंपाजवळ रविवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडला.

पडेगाव रोङवर दोन अपघातांत तीन जण ठार
औरंगाबाद : भरधाव कारने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण घटनास्थळीच ठार झाले. हा अपघात नाशिक महामार्गावरील पडेगाव येथील राणा पेट्रोलपंपाजवळ रविवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडला.
विनोद मनोहर पोळ (३२, रा. न्यायनगर) आणि अमोल दीपक गायकवाड (२६,रा. भानुदासनगर) अशी या तरुणांची नावे आहेत. दोन्ही तरुण घर बदलणाऱ्या लोकांचे संसारोपयोगी साहित्य हलविण्याचे काम करीत असत. रविवारी रात्री ते मोटारसायकलने (क्रमांक एमएच-२० एव्ही ५७६२) येत होते. पडेगाव येथील राणा पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या मोटारसायकलला विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव मारुती ८०० कारने (क्रमांक एमएच२० वाय८४१२) जोराची धडक दिली.
पडेगाव रोडवर सोमवारी सकाळी साडेदहा ते अकराच्या दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत स्कूटीचालक तरुण ठार झाला. धनंजय ऊर्फ नाना शिवाजी जमादार (३०,रा. माजी सैनिक कॉलनी, पडेगाव) असे त्याचे नाव आहे. धनंजय हा पडेगाव येथील केबल आॅपरेटरकडे कामाला होता. सोमवारी सकाळी तो स्कूटीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी जात असताना शरणापूर फाट्याजवळ अज्ञात वाहनाने त्यास उडवले. धनंजय हा घटनास्थळी सुमारे अर्धा तास बेशुद्धावस्थेत पडून होता. या घटनेची माहिती छावणी पोलिसांना मिळताच त्यांनी त्यास तातडीने घाटीत दाखल केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. धनंजय यास तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले. धनंजयच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि वृद्ध आई-वडील आहेत.