तिघांना सक्तमजुरीं
By Admin | Updated: April 14, 2015 00:45 IST2015-04-14T00:45:45+5:302015-04-14T00:45:45+5:30
परंडा : जनावरे घेवून जाणाऱ्या तिघांना कुऱ्हाड, कोयता, उसाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी तिघांना येथील न्यायालयाने सहा महिन्याचा सश्रम

तिघांना सक्तमजुरीं
परंडा : जनावरे घेवून जाणाऱ्या तिघांना कुऱ्हाड, कोयता, उसाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी तिघांना येथील न्यायालयाने सहा महिन्याचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली़ तर या प्रकरणातील एका आरोपीस पाच हजार रूपयांचा दंड ठोठावला़ ही घटना ७ नोव्हेंबर २००९ रोजी सकाळी परंडा शिवारात घडली होती़
शासकीय अभियोक्ता एस़ पी़ गुंजाळ यांनी सांगितले की, येथील उत्तरेश्वर यादव, अरूण यादव, हनमुंत यादव हे ७ नोव्हेंबर २००९ रोजी जनावरे घेवून पिंपरखेड रोडने जात होते़ या मार्गावरील तुरीच्या पिकात लपून बसलेल्या खाँजा बिस्ती व त्यांची मुले अकबर, नजीर व रशीद यांनी मागील भांडणाचा राग मनात धरून कोयता, कुऱ्हाड, उसाने मारहाण करण्यास सुरूवात केली़ अरूण यादव यांना मारहाण होत असताना सोडविण्यास आलेले त्यांचे वडील उत्तरेश्वर यादव व हनुमंत यादव या दोघांनाही काठी, कुऱ्हाड, कोयत्याने मारहाण केल्याबाबत परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या प्रकरणाचा पोकॉ गिरी यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ या प्रकरणी सरकार पक्षाकडून सहा साक्षीदार तपासण्यात आले होते़ समोर आलेले पुरावे, साक्ष व सरकारी वकिल एस़पीग़ुंजाळ यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने खॉजा बिस्ती यांना पाच हजार रूपयांचा दंडाची शिक्षा सुनावली़ तर तर नजीर, अकबर, रशिद यांना प्रत्येकी सहा महिने सश्रम कारावास व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली़ (वार्ताहर)