शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

एटीएम फोडणारे आणखी ३ जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2015 00:45 IST

औरंगाबाद : एटीएम फोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच जणांच्या टोळीतील फरार तिन्ही आरोपींना पोलिसांनी मंगळवारी सकाळी ६.३० वाजता जेरबंद केले. लोटाकारंजा भागात जिन्सी पोलिसांनी ही कारवाई केली

औरंगाबाद : एटीएम फोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच जणांच्या टोळीतील फरार तिन्ही आरोपींना पोलिसांनी मंगळवारी सकाळी ६.३० वाजता जेरबंद केले. लोटाकारंजा भागात जिन्सी पोलिसांनी ही कारवाई केली. दरम्यान, सोमवारी पहाटे २.३० वाजेच्या सुमारास पाठलाग करून या टोळीतील दोघांना अटक करण्यात आली होती. मंगळवारी जेरबंद केलेल्या तिघांना न्यायालयाने १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मंगल खराटे (२२, रा. पिंपरी गवळी, ता. मोताळा, जि. बुलडाणा), दिनेशकुमार डब्ल्यूकुमार (२१, रा. लोटाकारंजा), मेहफूस खान लईक खान (१९, लोटाकारंजा), अशी मंगळवारी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत, तर सोमवारी बंटा राजेश चौधरी (२६) आणि भोला रोहित चंमार (२१, दोघेही ह.मु. लोटाकारंजा, रा. भांडूप, मुंबई) यांना अटक केली होती. सहायक पोलीस निरीक्षक व्ही.एन. ठाकरे यांनी सांगितले की, अटकेतील पाचही आरोपी मूळचे उत्तर प्रदेश येथील असून, सध्या शहरात लोटाकारंजा येथे राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या टोळीकडून काही गंभीर चोरीच्या, एटीएम व बँक फोडीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, यातील काहींनी सिटीचौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुकानांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली आहे. पीसीआर मोबाईल कार क्र-२ ही आकाशवाणी चौकातून सोमवारी पहाटे जात असताना त्यांना काही संशयित लोक आढळले. पोलिसांनी आपली कार एसबीएच एटीएम सेंटरच्या दिशेने नेताच, पोलिसांना पाहून एटीएमबाहेर उभे असलेले तीन आरोपी ३० फूट उंचीवरून उड्या मारून पळून गेले, तर एटीएम फोडत असलेले दोन आरोपी एसबीएच इमारतीच्या वरच्या मजल्याच्या दिशेने जाऊ लागले. याप्रसंगी एका जणाला पोलिसांनी पाठलाग करून पकडले, तर अन्य एक आरोपी इमारतीच्या थेट तिसऱ्या मजल्यावरील पाण्याच्या टाकीमागे जाऊन लपला. त्यालाही बंदुकीच्या धाकावर पोलिसांनी जेरबंद केले. दोघांना ताब्यात घेतल्यानंतर मंगळवारी सकाळी लोटाकारंजा भागात ते राहत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून फौजदार आर.एन. शेख, पोलीस नाईक ज्ञानगीर गिरी, पोकॉ. पंढरीनाथ जायभाये यांनी उर्वरित तिघांच्याही मुसक्या आवळल्या. मंगळवारी अटक केलेल्या तिघांना न्यायालयाने १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जिन्सी पोलिसांनी या पाच जणांकडून एटीएम फोडण्यासाठी वापरण्यात येणारे ड्रिल मशीन, कटर, स्क्रू ड्रायव्हर आणि इतर साहित्याची एक बॅग जप्त केली आहे. तसेच पानटपरी फोडून त्यातून चोरलेले सहा हजार रुपये आणि उर्वरित मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ४संपूर्ण तयारीनिशी आलेल्या या टोळीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून, त्यांच्याकडून काही गंभीर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे.