उघड्या घरातून तीन मोबाइल चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:05 IST2021-07-03T04:05:01+5:302021-07-03T04:05:01+5:30

------------------------- मुलासह महिला बेपत्ता औरंगाबाद : अडीच वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन स्वाती उमेश सातपुते (३०) घरातून निघून गेल्याची ...

Three mobiles stolen from open house | उघड्या घरातून तीन मोबाइल चोरीला

उघड्या घरातून तीन मोबाइल चोरीला

-------------------------

मुलासह महिला बेपत्ता

औरंगाबाद : अडीच वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन स्वाती उमेश सातपुते (३०) घरातून निघून गेल्याची घटना हर्सूल परिसरातील फातेमानगरात घडली. विवाहितेचे वडील अशोक श्रीपाद पंडित यांनी हर्सूल ठाण्यात तक्रार नोंदविली. स्वाती यांची उंची ५ फूट, रंग गोरा, सडपातळ बांधा, अंगावर साडी आणि ब्लाऊज आहे. तर मुलगा प्रेमच्या अंगात जिन्स पॅण्ट आणि टी शर्ट आहे. या वर्णनाची महिला कोणास आढळल्यास हर्सूल पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस हवालदार डी.बी. काटकर यांनी केले आहे.

-----------------------------------

खडकेश्वर येथून मोटारसायकल चोरी

औरंगाबाद : खडकेश्वर येथील एका प्रार्थनास्थळाजवळ उभी मोटारसायकल (एमएच २० - डीआर ४५७५) चोरट्यांनी २७ जून रोजी दुपारी लंपास केली. याविषयी अब्दुल जब्बार शब्बीर शेख यांनी क्रांती चौक ठाण्यात तक्रार नोंदविली.

----------------------

पडेगाव येथून दुचाकी चोरी

औरंगाबाद : पडेगाव येथील एका हॉटेलजवळ उभी मोटारसायकल (एमएच २० - एफए ७३३४) चोरट्यांनी २७ जून रोजी रात्री चोरून नेली. निरंजनकुमार राजबहादूर बिष्ट यांनी छावणी ठाण्यात तक्रार नोंदविली.

--------------------------

Web Title: Three mobiles stolen from open house