निलंगा शहरात तीन लाखांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2017 23:42 IST2017-01-10T23:40:45+5:302017-01-10T23:42:17+5:30
निलंगा :रामकृष्ण नगरातील ओमप्रकाश बाहेती यांचे घर चोरट्यांनी फोडून २ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला

निलंगा शहरात तीन लाखांची घरफोडी
निलंगा : शहरातील रामकृष्ण नगरातील ओमप्रकाश सत्यनारायण बाहेती यांचे बंद असलेले घर अज्ञात चोरट्यांनी फोडून रोख रकमेसह सोन्या-सांदीचे दागिने असा एकूण २ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील रामकृष्णनगरात राहणारे ओमप्रकाश सत्यनारायण बाहेती यांचे घर आहे. घरातील सर्व जण इंग्रजी शाळेच्या स्रेहसंमेलनासाठी गेले होते. दरम्यान, घराला कुलूप असल्याने अज्ञात चारेट्यांनी सोमवारी रात्रीच्यावेळी घरात प्रवेश केला. घरातील तिजोरी फोडून १० तोळे सोन्याचे दागिने आणि रोख १० हजार रुपये असा एकूण २ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी निलंगा पोलिसांनी श्वानपथकास पाचारण करुन घटनास्थळाची पाहणी करुन, पंचनामा केला आहे. मंगळवारी दुपारी निलंगा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.