पाऊणेतीन लाखांचा ऐवज घरफोडीत लंपास

By Admin | Updated: March 27, 2016 00:02 IST2016-03-27T00:02:13+5:302016-03-27T00:02:13+5:30

बीड : शहरातील शहेंशाहनगर भागात बंद घर फोडून चोरांनी पाऊणे तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.

Three lakhs of rupees are left to the house | पाऊणेतीन लाखांचा ऐवज घरफोडीत लंपास

पाऊणेतीन लाखांचा ऐवज घरफोडीत लंपास


बीड : शहरातील शहेंशाहनगर भागात बंद घर फोडून चोरांनी पाऊणे तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.
शेख ईस्माईल शेख मन्सूर (रा. शहेंशाहनगर) हे खासगी वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करतात. ते आपल्या कुटुंबियांसमवेत शुक्रवारी बाहेरगावी गेले होते. घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन चोरांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाट फोडून दाह तोेळे दागिने व २६ हजार रुपये रो, असा दोन लाख ७१ हजार ५०० रुपयांचा ऐवज घेऊन चोरांनी पोबारा केला.
दरम्यान, शेख हे शनिवारी बाहेरगावहून घरी आले. यावेळी त्यांना दरवाजा उघडा दिसला. कपाटातील सामानही अस्ताव्यस्त पडलेले होते. घरफोडी झाल्याचे उघड झाल्यावर त्यांनी शहर पोलिसांशी संपर्क केला. त्यानंतर सहायक निरीक्षक सतीश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी शेख फातेमा शेख ईस्माईल यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद झाला.
चोरांच्या तपासासाठी शहर ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा व दरोडा प्रतिबंधक पथक असे मिळून तीन स्वतंत्र पथक स्थापन केले असून, ते रवाना झाले आहेत, असे सहायक निरीक्षक जाधव यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Three lakhs of rupees are left to the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.