दररोज तीन लाखांचा गुटखा फस्त
By Admin | Updated: August 9, 2014 00:39 IST2014-08-09T00:23:49+5:302014-08-09T00:39:50+5:30
श्रीक्षेत्र माहूर : माहूर शहरासह तालुकाभरात गुटखा, तंबाखू, सिगारेट, दारूसारख्या पदार्थांची खुलेआम विक्री वाढली असून बंदी असलेल्या गुटख्याची नियमांना पायदळी

दररोज तीन लाखांचा गुटखा फस्त
श्रीक्षेत्र माहूर : माहूर शहरासह तालुकाभरात गुटखा, तंबाखू, सिगारेट, दारूसारख्या पदार्थांची खुलेआम विक्री वाढली असून बंदी असलेल्या गुटख्याची नियमांना पायदळी तुडवून विक्री होत असल्याने एकट्या माहूर शहरात पानटपऱ्या व इतर विक्री केंद्रावरून दररोज तीन लाख रुपयांचा गुटखा माहूरकर फस्त करीत कॅन्सरसारख्या भयंकर रोगांना निमंत्रण देत आहेत़
माहूर शहरातील ग्रामीण रुग्णालयात कॅन्सर व तत्सम रोगावर तपासणी व उपचाराची सुविधा नसलयाने तंबाखु, गुटखा, दारूपासून होणाऱ्या रोगांवर उपचारासाठी रुग्णांना पुसद, यवतमाळ व नांदेडला जावे लागत असल्याने माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात एकाही रुग्णांची नोंद नाही़ शहर व देवस्थानावर असलेल्या शंभरावर पानटपऱ्या, छोटे किराणा दुकान व जनरल स्टोअर्सची दुकानावर विमल, सितार, गोवा, नागपुरी यासह सिगारेट व दारू तसेच पाणीपाऊचमध्ये हातभट्टीची दारू खुलेआमपणे विक्री होत असूनही अन्न व औषध प्राशसन विभाग, पोलिस तसेच महिन्यातून एकदा येवून दर्शन देणारा एलसीबी विभाग कुठलीच कार्यवाही करीत नसल्याने बंदी असलेले तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री भरमसाठ वाढलेली आहे़
गुटखा विक्रीच्या तक्रारी वाढल्याने माहूर पोलिसांनी आदिलाबादहून सारखणी व पुसदकडे जाणाऱ्या गुटखा तस्करांवर एक कार्यवाही केली़ परंतु सारखणी, वाईबाजार व माहूर ही ठिकाणे गुटखा विक्रीचे गढ असूनही या गुटखा माफियांवर पोलिस व अन्न औषधी प्रशासन विभाग आजपर्यंत यागुटखा माफीयांवर कार्यवाही करू शकला नाही़
अन्न व औषध प्रशासनमंत्री माहूरपासून ५० कि़मी़ अंतरावर पुसद येथे राहतात व पुसदही गुटखा विक्रीचे माहेरघर समजले जावूनही येथेही गुटखा विक्रेत्यांवर अंकुश नाही ही आश्चर्याची बाब आहे़
एकीकडे शासन नागरिकांचे आरोग्य अबाधित रहावे यासाठी राजीव गांधी आरोग्य जीवनदायी योजना व इतर योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी खर्च करीत असताना दुसरीकडे शासनाच्या कारभाराचा कणा असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांकडून गुटखा माफीयांना अभयदान देण्यासह नागरिकांना मृत्यूच्या खाईत लोटण्याचे महापाप घडत असल्याने तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष पथक पाठवून गुटखा, दारू व इतर घातक पदार्थ विक्री करणाऱ्यांना पायबंद घालावा, अशी मागणी व्यवनापायी तरूण मुले गमावलेल्या पालकांतून होत आहे़ (वार्ताहर)
तीन आरोपी जेरबंद
बाऱ्हाळी :मौजे कुंद्राळा येथील खूनाच्या घटनेतील तीन आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहेत़ विश्वंभर मल्हारी टिकनरे, दिगंबर मल्हारी टिकनरे, पांडुरंग महादू टिकनरे अशी आरोपींची नावे आहेत़ पिराजी टिकनरे, धुरपतबाई टिकनरे, रेखा टिकनरे यांच्या शोधात पोलिस आहेत़ ६ आॅगस्ट रोजी शेतीच्या वादावरून मारोती देवकत्ते यांचा खून झाला होता़
(वार्ताहर)