तीन लाख शेतकऱ्यांना मिळणार पीक कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2016 00:12 IST2016-05-11T00:10:28+5:302016-05-11T00:12:22+5:30
शिरीष शिंदे ल्ल बीड मान्सून सुरु होण्यास अद्याप महिन्याभराचा कालावधी असला तरी पीक कर्ज वाटपास एप्रिल अखेर पासून सुरुवात झाली आहे.

तीन लाख शेतकऱ्यांना मिळणार पीक कर्ज
आढावा बैठक : एप्रिल अखेरपासून कर्ज वाटपास सुरुवात; ३ टक्के वाटप पूर्ण
शिरीष शिंदे ल्ल बीड
मान्सून सुरु होण्यास अद्याप महिन्याभराचा कालावधी असला तरी पीक कर्ज वाटपास एप्रिल अखेर पासून सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील तीन लाख पाच हजार शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी १ हजार ७५० कोटी रुपये पीक कर्ज देण्यात येणार असून या संदर्भात दर आठवड्यास आढावा बैठक घेण्यात येत आहे. १० एप्रिलपर्यंत ३ टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे.
गत वर्षीच्या पीककर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याने जिल्ह्यातील २ लाख ४२ हजार ५७२ शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. यासह इतर नव्या पन्नास हजार शेतकऱ्यांचा यादीत समावेश झाल्याने तीन लाख पाच हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप होणार आहे. दरम्यान, खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वी बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पीक कर्ज वाटपाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही शेतकऱ्याची अडवणूक होणार नाही याची काळजी घेण्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपास अडचणी आल्यास त्याची दखल थेट जिल्हाधिकारी घेत आहेत. ७ हजार १२५ शेतकरी नुतणीकरण म्हणजेच जुनं-नव पीक कर्ज करतील. त्यांना ३६ कोटी ६२ लाख रुपये कर्ज या पद्धतीने वाटप होईल. ९ हजार ६३४ शेतकऱ्यांना ५३ कोटी ११ लाख पीक कर्ज देण्यात येणार आहे. मागच्यावर्षी जिल्ह्यातील २०२ बँक शाखांनी २ लाख ४२ हजार शेतकऱ्यांना पीक र्ज वाटप केले होते. यंदा त्यात दहा ते पंधरा टक्क्यांची वाढ आहे.
बँकांना ८० टक्के पीक विमा वाटपाचे उद्दिष्ट
मंगळवारी पीक कर्ज आढावा बैठक पार पडली. या वेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी गंगाधर बोकाडे, कृषी अधीक्षक रमेश भताने, एसबीएचचे पत्की यांच्यासह बँक अधिकारी उपस्थित होते. बँकांच्या पीक कर्जासंदर्भात अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या. जिल्ह्यात ८ लाख शेतकरी असून यावर्षी ८० टक्के पीक विमा वाटप झाला पाहिजे, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
बँक अधिकाऱ्यांना पीक कर्ज वाटपाच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. आठवड्याला जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली जात आहे. आतापर्यंत ३ टक्के पीक कर्ज वाटप झाले असून त्यात पुढील महिन्यात वाढ होईल. -गंगाधर बोकाडे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी