शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

तीन अपघातात तीन ठार

By admin | Updated: September 20, 2015 00:53 IST

पुणे : शहराच्या विविध भागांमध्ये झालेल्या तीन अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चतु:श्रुंगी, सिंहगड रस्ता, खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून मृतांमध्ये ६६वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचाही समावेश आहे. मदन गोपाळ गुप्ता (वय ६६, रा. यश रेसिडेन्सी, पाषाण सुस रस्ता) यांचा पाषाण रस्त्यावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. याप्रकरणी मोटारसायकलस्वार आकाश ...


पुणे : शहराच्या विविध भागांमध्ये झालेल्या तीन अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चतु:श्रुंगी, सिंहगड रस्ता, खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून मृतांमध्ये ६६वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचाही समावेश आहे.
मदन गोपाळ गुप्ता (वय ६६, रा. यश रेसिडेन्सी, पाषाण सुस रस्ता) यांचा पाषाण रस्त्यावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. याप्रकरणी मोटारसायकलस्वार आकाश राम ससार (रा. सुस गाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुप्ता साई चौकाजवळून रस्ता ओलांडत असताना त्यांना आकाश चालवीत असलेल्या मोटारसायकलची धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या गुप्तांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी रात्री आठच्या सुमारास घडला होता.
खडकी येथील रेंजहिल्स जवळील केंद्रिय विद्यालयासमोर पीएमपीची धडक बसल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडला होता. या अपघातात राजेश्वरा सी. एच. (वय ३२, रा. रेंजहिल्स, खडकी) यांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी स्वामीराव महादेव राजेगावकर (वय ३१, रा. वारजे) यांना अटक केली आहे. राजेगावकर चालवीत असलेल्या बसची राजेश्वरा यांना पाठीमागून धडक बसली होती.
तर मुंबई बेंगलोर महामार्गावर सनसिटीजवळ मंगळवारी एकच्या सुमारास झालेल्या अपघातात संतोष जगन्नाथ चोबे (वय ४१, रा. तारकेश्वर विहार सोसायटी, आनंदनगर, सिंहगड रस्ता) यांचा मृत्यू झाला. चोबे सनसिटी समोरील रस्त्याने चालत जात असताना भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली होती. सिंहगड रोड पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.