तिघे जागीच ठार
By Admin | Updated: October 14, 2014 00:38 IST2014-10-13T23:53:26+5:302014-10-14T00:38:20+5:30
वैजापूर : मोटारसायकल व कारच्या धडकेत तीन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली.

तिघे जागीच ठार
वैजापूर : मोटारसायकल व कारच्या समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत तीन जण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास तालुक्यातील वैजापूर-गंगापूर रस्त्यावरील चोरवाघलगाव शिवारात घडली.
लाला सय्यद शाह (२७), शायद कडू सय्यद (२५) (दोघे रा. म्हस्की) व दत्तू कारभारी करडे (३०), रा. सटाणा अशी या अपघातातील मृत झालेल्यांची नावे आहेत. हे तिघेजण लाकूडतोड कामगार असून कामासाठी मोटारसायकलवरून (क्र. एम.एच. १६ जी ८०१६) महालगावकडे जात होते. त्याचवेळी औरंगाबादहून वैजापूरकडे येणारी कार (क्र. एम.एच. २०, सी.एच. ४५२७) व मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, मोटारसायकलवरील दोघे जण जागीच गतप्राण झाले, तर अन्य एक उपचारार्थ नेत असताना रस्त्यात मृत झाला. अपघाताची माहिती मिळताच वीरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि डी.एन. रयतुवार, हवालदार ए.एस. गायकवाड, दिगंबर कराळे, माधव जरारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात हलविले. (वार्ताहर)