जिल्ह्यात विविध अपघातांत तिघे ठार
By Admin | Updated: March 27, 2015 00:39 IST2015-03-27T00:35:54+5:302015-03-27T00:39:49+5:30
उस्मानाबाद/परंडा/तेर : जिल्ह्यात तीन ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला़ हे अपघात परंडा, तेर व पारगाव परिसरात घडले असून

जिल्ह्यात विविध अपघातांत तिघे ठार
उस्मानाबाद/परंडा/तेर : जिल्ह्यात तीन ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला़ हे अपघात परंडा, तेर व पारगाव परिसरात घडले असून, संबंधित पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला़
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील डोमगाव येथील अतुल विक्रम नलवडे (वय-२४ ह़मु़बार्शी) हे गुरूवारी दुपारी बार्शी येथून कारमधून परंडा मार्गे सालसे (ताक़रमाळा)कडे निघाले होते़ त्यांची कार परंड्यानजीकच्या बुस्टरजवळ आली असता समोरून आलेल्या मालट्रकने (क्रक़े़ए़३२- ५९८६) जोराची धडक दिली़ या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अतुल नलवडे यांचा जागीच मृत्यू झाला़ तर ट्रकचालक मोहंमद खान याने वैराग पोलीस ठाणे गाठून अपघाताची माहिती दिली़ अपघाताचे क्षेत्र वैराग हद्दीत येत असल्याने रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती़ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला़
वाशी तालुक्यातील पारगाव येथील राष्ट्रीय महामार्गावर गुरूवारी दुपारी सोलापूरहून कापूस घेवून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या मालट्रकने (क्ऱएम़एच़२०- ए़टी़५९७५) एका ३८ वर्षीय इसमाला जोराची धडक दिली़ या अपघातात गंभीर जखमी झालेल्या इसमाचा जागीच मृत्यू झाला़ मात्र, एक ते दीड तासांनी पोलीस घटनास्थळी आल्यावर त्याचे पार्थिव पारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले़ याबाबत पोलीस पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात ट्रकचालक आनंदा माणिकराव वाघ (रा़वरूड ता़भोकरदन जि़जालना) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, मयत इसमाजवळील मोबाईलद्वारे त्याच्या नातेवाईकांना माहिती दिली असून, त्याचे नाव शरद काशीनाथ सूर्यवंशी (रा़सुरपान ता़साखरी जि़धुळे) असे असल्याचे समजल्याचे पोलिसांनी सांगितले़ (प्रतिनिधी)