कार-दुचाकी धडकेत ३ जखमी

By Admin | Updated: March 17, 2016 00:04 IST2016-03-17T00:00:20+5:302016-03-17T00:04:39+5:30

वसमत: औंढा- वसमत रस्त्यावर बुधवारी दुपारी चारच्या सुमारास कार व दुचाकीची धडक झाली. या अपघातात ३ जण जबर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारार्थ नांदेडला हलवण्यात आले आहे.

Three injured in car-bike shock | कार-दुचाकी धडकेत ३ जखमी

कार-दुचाकी धडकेत ३ जखमी

वसमत: औंढा- वसमत रस्त्यावर बुधवारी दुपारी चारच्या सुमारास कार व दुचाकीची धडक झाली. या अपघातात ३ जण जबर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारार्थ नांदेडला हलवण्यात आले आहे.
वसमतकडून औंढ्याकडे जाणाऱ्या दुचाकी व कारची धडक झाली. यात दुचाकीस्वार संदीप नवले (वय ३०), आतिष सखाराम कीर्तने (३२) हे दोघे (रा. जवळा बाजार) व महेश बळवंत सारणीकर (रा. जालना) हा कार क्र. एम. एच. २१ व्ही ९८८०) चा चालक जखमी आहे. दुचाकीवर क्रमांक नाही. तिन्ही जखमींना वसमत उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार करून उपचारासाठी नांदेडला पाठवण्यात आले आहे. (वार्ताहर)
चोंढी स्टेशन येथे चोरी
कुरुंदा : वसमत तालुक्यातील चोंढी रेल्वेस्टेशन येथे चोरट्याने डब्यात ठेवेलेले ६ हजार ५०० रुपये नगदी व चांदीचे कडे चोरल्याची घटना १६ मार्च रोजी रात्री घडली.
फिर्यादी रोहिदास गायकवाड हे उन्हाळ्यामुळे घर उघडे ठेवून झोपले होते. त्याचा चोरट्याने फायदा घेवून साखरेच्या डब्यात ठेवलेले ६ हजार ५०० रुपये नगदी व लहान बालकाचे चांदीचे कडे २५० रु किंमतीचे चोरले. या प्रकरणी दीपक जोंधळेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी फरार असून पुढील तपास जमादार भगवान वडकिल्ले हे करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Three injured in car-bike shock