तीन ग्रामसेवक तडकाफडकी निलंबित

By Admin | Updated: May 13, 2014 01:15 IST2014-05-12T23:10:16+5:302014-05-13T01:15:46+5:30

बीड : ग्रामपंचायती आॅनलाईन करण्याच्या कामात हलगर्जीपणा केल्यामुळे सोमवारी तीन ग्रामसेवकांना सीईओ राजीव जवळेकर यांनी चांगलाच दणक ा दिला़

Three Gramsevak Tadkafady Suspended | तीन ग्रामसेवक तडकाफडकी निलंबित

तीन ग्रामसेवक तडकाफडकी निलंबित

बीड : ग्रामपंचायती आॅनलाईन करण्याच्या कामात हलगर्जीपणा केल्यामुळे सोमवारी तीन ग्रामसेवकांना सीईओ राजीव जवळेकर यांनी चांगलाच दणक ा दिला़ या त्रिकुटाचे तडकाफडकी निलंबन केल्याने कामात कुचराई करणार्‍या ग्रामसेवकांची अक्षरश: झोप उडाली आहे़ पाटोदा पंचायत समितीतील एल़ एस़ जमदाडे, टी़सी़ गावित व माजलगाव तालुक्यातील सावरगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक जी़ बी़ सोळंके अशी निलंबित ग्रामसेवकांची नावे आहेत़ जिल्हा परिषदेच्या वतीने सध्या ग्रामपंचायती आॅनलाईन करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहेत़ १९६२ पासूनचे अभिलेखे आॅनलाईन करण्याच्या या कामात हलगर्जीपणा करु नका, अशा सक्त सूचना सीईओ राजीव जवळेकर यांनी दिल्या होत्या़ मात्र, याउपरही पाटोदा पंचायत समितीतील जमदाडे व गावित तसेच सावरगाव ग्रा़पं़ मधील सोळंके यांनी आॅनलाईनच्या कामात हलगर्जीपणा केला, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे़ २०१३- १४ या वर्षातील आर्थिक अभिलेखे आॅनलाईन केले नाहीत़ तसेच मासिक बैठकांना गैरहजर राहिले, आॅनलाईनसाठीची माहिती प्रमाणित केली नाही असेही निलंबन आदेशात नमूद आहे़ पाटोदा पंचायत समिती व माजलगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांमार्फत त्यांचा अहवाल सीईओ राजीव जवळेकर यांना प्राप्त झाला होता़ त्यानंतर सोमवारी सीईओ जवळेकर यांनी या तिघांच्याही निलंबनाचे आदेश दिले़ महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा शिस्त व अपिल अधिनियम १९६४ मधील कलम ३०१ च्या तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे़ या कारवाईने ग्रामसेवकांत खळबळ उडाली आहे़(प्रतिनिधी) हलगर्जीपणा करणार्‍यांची गय नाही ग्रामपंचायती आॅनलाईन करण्याच्या कामात बीड जिल्ह्याची चांगली प्रगती होत आहे़ या कामात कोणी हलगर्जीपणा केला तर त्याची कदापि गय केली जाणार नाही़ आॅनलाईनचे काम वेगाने पूर्ण झाले तर त्याचे श्रेय ग्रामसेकांनाच जाणार आहे़ त्यामुळे या कारवाईतून इतर ग्रामसेवकांनी धडा घ्यावा, अशी प्रतिक्रिया सीईओ राजीव जवळेकर यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली़

Web Title: Three Gramsevak Tadkafady Suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.