छत्रपती संभाजीनगर : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचा रेल्वे स्टेशन येथील मालधक्का दौलताबाद येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. एकाचवेळी तीन मालगाड्या उभ्या राहतील, असा हा मालधक्का राहणार असून, जूनपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती ‘दमरे’च्या अधिकाऱ्यांनी दिली.
रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करण्यात येत असून, यात साताऱ्याच्या दिशेनेही रेल्वे स्टेशनची इमारत उभारण्यात येत आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशनवरील मालधक्का इतरत्र स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी अनेक दिवस जागेचा शोध घेण्यात आला. अखेर दौलताबाद येथील जागेवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
१२ एकर जागेत मालधक्कादौलताबाद येथे १२ एकर जागेत हा मालधक्का साकारण्यात येत आहे. यात तीन लाइन असतील आणि दोन प्लॅटफाॅर्म असतील. त्यांचा वापर फक्त मालवाहतुकीसाठी केला जाणार आहे. मालधक्क्यासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
सध्याचा मालधक्का कसा?रेल्वे स्टेशनवरील सध्याच्या मालधक्क्यावर एकावेळी दोन मालगाड्या उभ्या राहू शकतात. येथे देशभरातून सिमेंट, तांदूळ, गहू यासह युरिया आणि इतर मालाची आवक होत असते. ट्रॅक्टरही मालधक्क्यावर उतरविण्यात येतात. शहरातून तीनचाकी वाहने मालधक्क्यावरून पाठविण्यात येतात. विविध माल येथून देशातील विविध भागांत पाठविण्यात येतो. पुढे याची वाहतूक दौलताबादहून होईल.
दौलताबाद स्टेशन येथे काय काय होणार?- गुड्स साइडिंग लाइन- प्लॅटफाॅर्मचे बांधकाम- हमाल आणि व्यापारी खोल्या- ट्रॅक टाकणे आणि जोडणे- कामाचा कालावधी - १८ महिने