तीन वीजबिल भरणा केंद्र केली बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 01:00 IST2017-11-16T00:59:25+5:302017-11-16T01:00:37+5:30
नांदेड: वीजबिल स्वीकारण्याकरिता महावितरणने नेमणूक केलेल्या इलेक्ट्रीकल पॉवर स्वयंम रोजगार सेवा सहकारी संस्थेच्या वतीने शहर विभागांतर्गत सुरू असलेली तीन वीजबिल भरणा केंद्र बंद करण्यात आली़ परिणामी महावितरणने कर्मचाºयांची नेमणूक करून स्वतंत्र व्यवस्था केली आहे.

तीन वीजबिल भरणा केंद्र केली बंद
नांदेड: वीजबिल स्वीकारण्याकरिता महावितरणने नेमणूक केलेल्या इलेक्ट्रीकल पॉवर स्वयंम रोजगार सेवा सहकारी संस्थेच्या वतीने शहर विभागांतर्गत सुरू असलेली तीन वीजबिल भरणा केंद्र बंद करण्यात आली़ परिणामी महावितरणने कर्मचाºयांची नेमणूक करून स्वतंत्र व्यवस्था केली आहे.
शहर विभागांतर्गत सुरू असलेल्या देगलूर नाका, मिलगेट कॉर्नर आणि गुरूद्वारा गेट कौठा या ठिकाणी इलेक्ट्रीकल पॉवर स्वयंम रोजगार सेवा सहकारी संस्थेच्या वतीने सुरू असलेली वीजबिल भरणा केंद्र अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्यास असमर्थता दर्शविल्यामुळे महावितरणने तीनही ठिकाणची वीजबील भरणा केंद्र बंद केली आहेत. महावितरणचा ग्राहक वेठीस धरला जाऊ नये, वीजबिल भरण्यास आलेल्या ग्राहकांची गैरसोय होवू नये म्हणून महावितरणच्या लेखा विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक सावंतराव यांनी तत्काळ मिलगेट कॉर्नर येथील शाखा कार्यालयात वीजबिल भरण्याची पर्यायी व्यवस्था करून दिली आहे. तसेच गुरूद्वारा गेट कौठा येथील वीजग्राहकांच्या सोयीसाठी शहरी उपविभाग एमआयडीसी येथील कार्यालयामध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. वीजबिल वसुलीच्या रक्कमेच्या प्रमाणात नियमाप्रमाणे अतिरिक्त सुरक्षा ठेव जमा न करण्याच्या संदर्भाने एजन्सीना नोटिसा दिल्या होत्या.