विविध घटनांत तिघांचा मृत्यू

By Admin | Updated: April 9, 2015 00:13 IST2015-04-09T00:00:53+5:302015-04-09T00:13:42+5:30

लातूर : लातूर जिल्ह्यात विविध घटनांत तिघांचा मृत्यू झाला आहे.

Three deaths in various cases | विविध घटनांत तिघांचा मृत्यू

विविध घटनांत तिघांचा मृत्यू


लातूर : लातूर जिल्ह्यात विविध घटनांत तिघांचा मृत्यू झाला आहे. याबाबत संबंधित पोलिस ठाण्यांत नोंद आहे.
चाकूर तालुक्यातील घरणी येथील आशाबाई प्रताप शिंदे (वय ३५) या त्यांच्या नातेवाईकांच्या दुचाकीवर बसून जात असताना नळेगाव ते घरणी या रस्त्यावर गुरुवारी दुचाकी घसरल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना लातूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत चाकूर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद आहे.
दुसऱ्या घटनेत उदगीर तालुक्यातील बनशेळकी येथील महादेव भीमदास लोहारे (वय २४) या युवकास उदगीरच्या सरकारी दवाखान्यात दाखल केले असता त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद आहे.
तिसऱ्या घटनेत लातूरच्या शिवनगर भागातील प्रफुल्ल करबसप्पा करपे (वय ४०) यांनी आरोग्याच्या त्रासाला कंटाळून विषारी द्रव प्राशन केल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास हवालदार बिराजदार करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Three deaths in various cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.