शवविच्छेदनामुळे सापडले तीन नराधम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:42 IST2017-07-22T00:41:00+5:302017-07-22T00:42:32+5:30

बर्दापूर : आई-वडील वीटभट्टीवर कामाला होते. याच वीटभट्टीवरील कामगारांनी अल्पवयीन मुलीला शिकार बनवीत अत्याचार केला.

Three dead bodies found due to postmortem | शवविच्छेदनामुळे सापडले तीन नराधम

शवविच्छेदनामुळे सापडले तीन नराधम

लोकमत न्यूज नेटवर्क
बर्दापूर : आई-वडील वीटभट्टीवर कामाला होते. याच वीटभट्टीवरील कामगारांनी अल्पवयीन मुलीला शिकार बनवीत अत्याचार केला. सदर मुलीने आत्महत्या केली. शवविच्छेदन केल्यानंतर तिच्या पोटात गर्भ आढळला. त्यानंतर बलात्काराचे रहस्य उलगडले अन् तीन नराधमांविरुद्ध बर्दापूर पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
दत्ता अनुरथ रोडे, धनंजय रोडे (रा. कन्हेरवाडी, ता. परळी) व सौदागर दत्तात्रय नरसे (रा. अंबाजोगाई) अशी या नराधमांची नावे आहेत. पीडित मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत गिरवली येथे राहत होती. आई-वडील वीटभट्टीवर काम करतात. परिस्थितीमुळे पीडित मुलगीही त्यांना अधूनमधून कामात मदत करायची. याच वीटभट्टीवर अनेक कामगार कामाला होते. येथील काही नराधमांनी पीडितेला शिकार बनवीत जाळ्यात ओढले. १ मार्च ते ११ जुलैदरम्यान तिच्यावर ठिकठिकाणी नेऊन अत्याचार करण्यात आला. १२ जुलै रोजी पीडितेने आत्महत्या केली. या प्रकरणी बर्दापूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती.
दरम्यान, आत्महत्येनंतर पीडितेचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यात तिच्या पोटात डॉक्टरांना गर्भ आढळून आला. त्यानंतर खळबळ उडाली. पीडितेच्या वडिलांनी बर्दापूर पोलीस ठाण्यात धाव घेत गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. पोलीस उपअधीक्षक विशाल आनंद या घटनेचा तपास करीत आहेत.

Web Title: Three dead bodies found due to postmortem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.