उद्यापासून तीन दिवस निर्जळी
By Admin | Updated: July 13, 2017 01:05 IST2017-07-13T00:58:57+5:302017-07-13T01:05:03+5:30
औरंगाबाद : वीज वितरण कंपनी शुक्रवारी सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत जायकवाडीत दुरुस्तीचे काम हाती घेणार आ

उद्यापासून तीन दिवस निर्जळी
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : वीज वितरण कंपनी शुक्रवारी सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत जायकवाडीत दुरुस्तीचे काम हाती घेणार आहे. त्यामुळे शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा तब्बल १२ तास बंद राहणार आहे. या खंडण काळामुळे तब्बल तीन दिवस शहराला निर्जळीचा सामना करावा लागणार आहे. शनिवारी आणि रविवारी ज्या वसाहतींना पाणीपुरवठा होणार आहे, त्या वसाहतींना एक दिवस उशिरा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. सिडको- हडको आणि शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी किमान ३ दिवसांचा कालावधी लागणार आहे.
जायकवाडी येथील नवीन व जुन्या पाणीपुरवठा योजनेस पैठण येथील १३२ के.व्ही. उपकेंद्रातून वीजपुरवठा करण्यात येतो. या सबस्टेशन अंतर्गत अत्यावश्यक दुरुस्तीची कामे करण्यासाठी वीज वितरण कंपनीला मनपाने परवानगी दिली आहे़ त्यामुळे जायकवाडी ते शहरापर्यंत १०० व ५६ एमएलडीच्या दोन्ही योजनांचा पाणीपुरवठा शुक्रवारी बारा तास बंद राहणार आहे़ त्यानंतर वीजपुरवठा सुरू होईल. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी किमान तीन दिवस लागणार असल्याचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी सांगितले.