बलात्कारप्रकरणी नराधमाला तीन दिवसांची कोठडी
By Admin | Updated: August 25, 2016 01:01 IST2016-08-25T00:46:48+5:302016-08-25T01:01:48+5:30
लातूर : पंजाब येथून लातुरात मजुरीसाठी आलेल्या कुटुंबातील एका पाच वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून

बलात्कारप्रकरणी नराधमाला तीन दिवसांची कोठडी
लातूर : पंजाब येथून लातुरात मजुरीसाठी आलेल्या कुटुंबातील एका पाच वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून, त्याला बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
लातूर शहरातील बार्शी रोडवर असलेल्या केंद्रीय राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्रात ठेकेदारामार्फत मजुरीसाठी पंजाबमधील एक कुटुंब लातुरात आले होते. याच कुटुंबातील पाच वर्षीय चिमुकलीवर घरात कोणीच नसल्याचे पाहून पंजाबमधील श्रवण वल्द दलविंदर सिंग (२७ रा. अमृतसर, पंजाब) या नराधमाने बलात्कार केला. या प्रकरणी एमाअयडीसी पोलिस ठाण्यात मंगळवारी पहाटे गुन्हा नोंद होता.