आंबेडकर जयंतीनिमित्त तीन दिवसीय व्याख्यानमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:02 IST2021-04-20T04:02:01+5:302021-04-20T04:02:01+5:30

अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत यांनी या व्याख्यानमालेचे उद्घाटन केले. ...

A three-day lecture series on the occasion of Ambedkar's birth anniversary | आंबेडकर जयंतीनिमित्त तीन दिवसीय व्याख्यानमाला

आंबेडकर जयंतीनिमित्त तीन दिवसीय व्याख्यानमाला

अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत यांनी या व्याख्यानमालेचे उद्घाटन केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, अ.भा.कॉंग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय समन्वयक मनोज बागडी , प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे , कार्याध्यक्ष डॉ. जितेंद्र देहाडे, मुख्य आयोजक कार्याध्यक्ष गौतम आरकडे यांची उपस्थिती होती. १६ एप्रिल रोजी डॉ. सुखदेव थोरात यांनी पहिले पुष्प गुंफले. १७ एप्रिल रोजी प्रा. प्रदीप मंडल यांनी दुसरे पुष्प गुंफले. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ.अरुण शिरसाट यांनी आभार मानले.

Web Title: A three-day lecture series on the occasion of Ambedkar's birth anniversary